Translate :

Sponsored

Niraj Chopra in Doha Diamond League 2025 : निरज चोप्राचा नविन रेकॉर्ड: दोहा मध्ये 90 मीटर भालाफेक

सलग दोन वेळा ऑलम्पिक मेडल मिळवणारा भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू  निरज चोप्राने (Niraj Chopra) आपल्या कारकिर्दीची घोडदौड कायम राखली आहे. दोहामधील डायमंड लीगमध्ये (Doha Diamond League 2025) त्याने आपल्या खेळाची जादू पुन्ही एकदा दाखवून रेकॉर्ड केले आहे. 

दोहा : 2025-05-17

भारताचा स्टार खेळाडू निरज चोप्रा (Niraj Chopra) याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण देश त्याच्या या कामगिरीची वाट पहात होते. दोहा डायमंड  लीग  2025 मध्ये त्याने 90.23 मीटर भाला फेकून नवीन नॅशनल रेकॉर्ड केला आहे. त्याने पहिल्यांदा 90 मीटर लांब भाला फेकून हा रेकॉर्ड केला आहे. भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील ही सर्वात उत्तम कामगिरी आहे. ही सर्वोत्तम कामगिरी करून  त्याने भालाफेकीतील सर्व दिग्गजांना मागे टाकत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे डायमंड लीग मध्ये त्याच्या मानांकनात मोठी बढती मिळाली आहे. 

निरज चोप्राचा (Niraj Chopra) याआधीचा स्कोअर 89.94 मीटर होता. 2022 मध्ये स्टॉकहॉम येथील डायमंड लीगमध्ये हा 89.94 मीटरचा स्कोअर केला होता. यावर्षीच्या हंगामात त्याने पहिल्यावेळी 88.44 मीटर ने सुरुवात केली होती. तीसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटरचा एतिहासिक विक्रम करून त्याने संपूर्ण देशाला खुश केले आहे.  भारताच्या ॲथलिट इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored