Kranti Redkar Real Surname: क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली कलाकार आहे. अभिनेत्रीबरोबरच दिग्दर्शिका म्हणून तिला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहितीये का क्रांती आता सध्या जे अडनाव लावते ते तिच खरं अडनाव नाहीच आहे. खरं तर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी नावात बदल केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रांतीने खुलासा केलाय की तिचं खरं अडनाव काय आहे आणि रेडकर अडनाव कसं मिळालं.
मनोरंजन : 2025-06-22
एका मराठी ओटीटी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने हा खुलासा केला आहे. तसंच, तिच्या अडनावामागची गोष्टदेखील सांगितली आहे. क्रांतीचे खरं अडनाव रेडकर नसून राणे असल्याचा खुलासा केला आहे. मुळ गाव कुठलं या प्रश्नाचे देखील तिने उत्तर दिले आहे. माझे आजोबा हे मालवणचे आहेत आणि आमचं कुलदैवत रेड्डीला आहे. त्यामुळं आमचं खरं अडनाव हे राणे असं आहे. आमचे पूर्वज जे राणे होते ते रेड्डीवरुन निघाले आणि मालवणला येऊन स्थायिक झाले. साधारण चार पिढ्यांपासून रेडकर हे अडनाव आम्ही लावतो, असं क्रांतीने म्हटलं आहे.
म्हणजेच मालवणला स्थायिक झाल्यानंतर क्रांतीचे अडनाव रेडकर असं झालं त्यापूर्वी ती राणे हे अडनाव लावत होती. तिचे लग्नानंतरचे अडनाव मात्र वानखेडे असं आहे. 2017 साली तिचे समीर वानखेडे यांच्याशी लग्न झाले. तसंच, क्रांतीला दोन जुळ्या मुलीदेखील आहेत. ती अनेकदा तिच्या मुलींचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. विविध रिल्स शेअर करत ती तिच्या जुळ्या मुलींचे किस्से सांगत असते. इतकंच नव्हे तर, क्रांतीचा झिया झायदा असा क्लोथिंग ब्रँडदेखील आहे. त्यासोबतच तिचा ज्वेलरी ब्रँडदेखील आहे.