Translate :

Sponsored

Devendra Fadanavis Reaction : ‘ अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही…’; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया : Devendra Fadanavis News Devendra Fadanavis Emotional Reaction To Ajit Pawar Death

अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही...'; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया (फोटो संग्रहीत, साभार सोशलमीडिया)

Devendra Fadanavis Reaction : महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. या लोकनेत्याविषयी जनसामान्यांसह राजकीय नेत्यांनीही अतोनात दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत शोक व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई : 28-01-2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज अपघाती (Devendra Fadanavis Reaction )निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवरा यांचा मृत्यू झाला. लॅंडीग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिनीवरच कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजकीय नेते, पवार कुटुंब, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वजण बारामतीला रवाना झाले आहे. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis Reaction)  यांनी पहीली प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?  (Devendra Fadanavis Reaction)

” आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडली. विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्याची वार्ता सर्वांनाच मिळाली. महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजितदाद पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राची कानाकोपफ्याची माहिती असलेला, राज्याच्या प्रश्नाची जाण असलेले नेते होते. अजित दादांबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंज आस्था होती. अजित दाद संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थिती न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस कठिण आहे. अजितदादांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार महत्त्वपूर्ण योगदान देत होते. त्यांचं असं जाणे मनाला चटका लावणारे आहे.

दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावरही हा प्रचंड मोठा आघात आहे. एकनाथ शिंदे आणि मी बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनीही यावर खुप दुःख व्यक्त केले आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील.

सुप्रिया ताई आणि पार्थ पवार यांच्याशी बोलणं झालं. बारामतीला पोहोचल्यावर पुढचे सर्व निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील. आज राज्यभरात शासकीय सुट्टी घोषीत करत आहोत. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना लवकरच दिली जाईल. अजित पवारांचं जाणं हे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आम्ही इतक्या जवळून सोबत काम केलं आहे. खरं तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. पुढच्या गोष्टी त्यांच्या कुटुंबियांशी बोलून ठरवल्या जातील “

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored