Translate :

Sponsored

Devendra Fadanavis Announcement, 2025 , Good News : महिला वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा ! : Maharashtra CM Devendra Fadanavis Announcement About World Cup Winning Palyer

भारतीय महिला क्रिकेटर्सच्या सत्काराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घोषणा.

Devendra Fadanavis Announcement : नुकताच भारताच्या महिला क्रिकेट संघाने महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरून इतिहास घडवला. या संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडू सामील होत्या. त्यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी यावेळी चर्चा केली. जाणून घेऊयात इतर निर्णय.

मुंबई : 04/11/2025

“वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांच्या चमूने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्या बद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे त्या टीममध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीन खेळाडू आहेत, स्मृती मांधाना जेमिमा रॉड्रीक्स आणि राधा यादव या तिन्ही खेळाडूंचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने केला जाणार आहे. आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज दिलं जाणार आहे. भारताची मान उंचावणाऱ्यांचा सर्व प्रकारे सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात जेव्हा शक्य असेल, संपूर्ण टीम मुंबईत असेल, त्या टीमचा सत्कार करू,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस (Devendra Fadanavis Announcement) यांनी केली.

महात्मा फुले जनारोग्य योजनेचा विस्तार (Devendra Fadanavis Announcement)

महात्मा फुले जनारोग्य योजना आहे, त्यात आतापर्यंत 1300 आजार अधिसूचित केले होते. त्यात आता वाढ करून 2400 आजारांचा समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांकरिता पाच लाखांपर्यंत सर्व खर्च केला जाईल. काही आजार असे चिन्हीत केले आहेत, ज्यात अधिकचा खर्च आहे. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक आजारांचे पॅकेज हे नवीन रेटने काही ठिकाणी दुप्पट केलं आहे. महाराष्ट्रातील गोरगरीबांना मोफत चांगले उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, अशी माहिती देंवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बिबट्यांचा प्रश्न (Devendra Fadanavis Announcement)

“पुणे जिल्ह्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना आहे. पुणे नगर जिल्ह्यात 1300 बिबट्यांचं विचरण सुरू आहे. केंद्र सरकारशी यावर चर्चा सुरू आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चा करतोय. या संदर्भात वळसे-पाटील आले होते, त्यांनी हा सर्व मु्द्दा गंभीरतेने मांडला. केंद्र सरकारला विनंती करणार आहे की, हे बिबटे पकडून रेस्क्यू सेंटकरडे देण्याती परवानगी द्यावी अशी विनंती करणार आहोत. त्या सोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायजेशन धोरण राबवण्याची परवानगी द्यावी. ही संख्या मोठी झालेली आहे. स्टरलायझेशन प्रोगॅम करण्याची परवानगी मागणार आहोत. बिबट नरभक्षी होतो, तेव्हा पुटडाऊन करण्याची मागणी करणार आहोत”. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored