Translate :

Sponsored

Delhi Student Suicide, Shocking News : दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ ! दहावीच्या विद्यार्थ्याची मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या.. : Delhi Student Commits Suicide By Jumping From Delhi Metro Station harassed By Teachers

दिल्लीतील दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. (फोटो - सोशल मीडिया )

Delhi Student Suicide : मुळ सांगली जिल्ह्यातील मात्र सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

दिल्ली : 20/11/2025

दिल्लीमध्ये इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याने मेट्रोसमोर उडी मारून जीव दिली. मुळ सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शौर्य प्रदीप पाटील (वय 17 वर्षे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबल शाळेत शिकत होता. सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

शौर्य पाटील होता मुळ सांगलीचा Delhi Student Suicide

मुळ सांगली जिल्ह्यातील असणारा शौर्य हा दिल्लीमध्ये दहावीचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील प्रदिप पाटील हे सोेने-चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून नवी दिल्लीतील राजीव नगर भागात स्थायिक आहेत. शौर्य हा दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. ते मुळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होते. मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काय लिहिले आहे सुसाईट नोट मध्ये ? Delhi Student Suicide

पोलिसांना शौर्य पाटीलच्या शाळेच्या दप्तरामधून एक दीड पानाची सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. ” मेरा नाम शौर्य पाटील हैं..  आय एम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय ॲम सॉरी,मै उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं. स्कूूल की टिचर है ही ऐसी क्या बोलू”. असे त्याने सुसाईज नोटमध्ये नमूद केले आहे.

सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी शाळेवर कारवाई केली आहे. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्य अपराजिता पाल यांच्यासह मनू कालरा,युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गीस या चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शौर्यचे वडील प्रदीप पाटील कामानिमित्त ढवळेश्वर येथे आले असताना त्यांना या आत्महत्येबद्दल समजले. आज 20 नोव्हेंबर 2025 ला शौर्य पाटील याच्यावर त्याच्या मुळगावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored