Translate :

Sponsored

Delhi Red Fort Blast, Shocking News : दिल्ली स्फोटातील I-20 कारचा मालक कोण ? नाव आले समोर : Delhi Red Fort Blast Police Found Blast Car Owner Name.

दिल्ली स्फोटामधील कारचा मालक कोण याची माहिती समोर आली आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाला असून एकुण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या कारच्या मालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अधिक माहिती जाणून घेऊ.

दिल्ली : 10/11/2025

दिल्लीच्या लाल किल्ला (Delhi Red Fort Blast)  परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एकुण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार केले जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाची ही माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील सक्रिय झाले आहेत. त्यांनी दिल्ली पोलिसांना तत्काळ फोन कॉल करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी रूग्णालयात जाऊन जखमी व्यक्तींचीही भेट घेतली आहे. असे असतानाच आता या स्फोटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या कारमालकाचे नाव समोर आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

स्फोटाबाबतची अधिक माहिती (Delhi Red Fort Blast)

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सुभाष मार्गाजवळच्या सिग्नलजवळ हा स्फोट झाला आहे. अगोदर एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगितले जात होते. आता मात्र खुद्द अमित शहा यांनी हा स्फोट आय-20 या ह्युंदाई कंपनीच्या कारमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले आहे. ही कार आता पोलिसांनी, फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतली असून तिची तपासणी केली जात आहे. कारमध्ये असलेले सर्व पुरावे गोळा केले जात आहे.

कारचा मालक कोण ? (Delhi Red Fort Blast)

हा स्फोट होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही आता ताब्यात घेतले जात आहेत. सीसीटीव्हींची चाचणी करून हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतपर्यंत केलेल्या तपासातून आय-20 कारच्या मालकाचे नाव समोर आले आहे. या कारची पासिंग हरियाणातील गुरूग्राम येथील असून कारचा मालक हा नदीम खान नावाची व्यक्ती आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored