Translate :

Sponsored

Delhi Bomb Blast, Shocking Update : आयुष्यात असा स्फोट पाहिला नाही..; प्रत्यक्षदर्शींनी कथन केले थरारक अनुभव : Red Fort Delhi Bomb Blast Eyewitness Recounts Experience

दिल्ली बॉम्ब स्फोटाचे प्रत्यक्षदर्शींनी अनुभव कथन केले आहेत (फोटो -सोशलमीडिया)

Delhi Bomb Blast : दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला आहे. मेट्रो स्थानक गेट क्रमांक 1 च्या जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने अनुभव सांगितला आहे.

Delhi Bomb Blast: दिल्ली : 10/11/2025

राजधानी दिल्ली ही बॉम्बस्फोटाने हादरली आहे. गजबजलेल्या लाल किल्ला मेट्रो स्थानक परिसरामध्ये हा भयानक स्फोट झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, कार आणि आजूबाजूच्या सर्व गाड्यांच्या चक्काचूर झाला आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी जमिनीवर पडले. कारच्या चिंधड्या उडाल्या. आगीचे लोळ आकाशात गेले आणि चारी बाजूंनी धुराने परिसर काळवंडला. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शींचे अनुभव  (Delhi Bomb Blast)

दिल्लीमधील या ब़ॉम्बस्फोटामध्ये 24 जण जखमी झाले असून जखमींना एलएनजेपी रूग्णालयात दाखल केले आहे. यामुळे संपूर्ण परिसर एका मोठ्या धक्क्यात आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे भयानक अनुभव सांगितले आहेत. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक 1 च्या जवळ झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की इमारतीच्या खिडक्या उघडल्या गेल्या. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आपण दुकानातल बसला असता अचानक इतका मोठा धमाका झाला की या हादऱ्याने खुर्चीतून आपण खाली पडलो. आयुष्यात इतका भयानक धमाका कधी ऐकला नाही असेही काहींनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शींचे अनुभव  (Delhi Bomb Blast)

आणखी एकाने सांगितले की, या घटनेचा आवाज अत्यंत मोठा होता. आम्ही लांब होतो त्यानंतर आम्हाला पोलिसांनी सतर्क केले की असा स्फोट झाला आहे. त्यानंतर घटनास्थळाहून गाड्या काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर तिथे काहीच उरले नव्हते. कार आणि गाड्यांचा चक्काचूर झाला होता. तर काही लोकांची शरीर पूर्णपणे उद्धवस्त होऊन पडली होती. काही लोकांचे अर्धे मृतदेह हे बाहेर काढण्यात आले. असे अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले आहेत.

ऐकाने सांगितले की, स्फोट झाला त्या ठिकाणी अनेक लोकं होती. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे अनेक लोकं हे जखमी झाले असणार आहेत. आम्हाला कळलंच नाही की नक्की काय झालं ? पण अनेक लोकं यामध्ये मृत्यू झाले असतील अशी शक्यता आहे. कारण स्फोटाचा आवाज प्रचंड होता. सगळ्या गाड्यांना आग लागली. कोणत्या गाडीने पेट घेतला असे वाटले.

दिल्ली बॉम्ब स्फोटाविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored