Delhi Bomb Blast Update : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 600 लोकांना ताब्यत घेण्यात आले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली.
जम्मू-काश्मीर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला. यामध्ये 9 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. सर्वांनी रोष व्यक्त केला जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या लोकांचा देखील समावेश असल्याचे दिसून आले आहे. यानंतर आता सुरक्षा हाय अलर्टवर आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये काही बाबी या ताब्यत घेण्यात आल्या आहेत.
दिल्लीच्या बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये दहशतवादी संघटनांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काश्मीरमधील 500 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. यावेळी 600 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. काश्मिरमधील ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली. या संघटनेबाबत सुरक्षा एजन्सिला इनपुट मिळाले होते. या मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करण्यात आली. यामध्ये श्रीनगर, पुलवामा, कुलवामा, शोपिया आणि बारामुला या जिल्ह्यांसह काही इतर भागांचा समावेश आहे.
अनेकजणांना अटक आणि चौकशी ( Delhi Bomb Blast Update )
डॉक्टर मॉड्यूलवरही कारवाई कऱण्यात आली आहे. तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू काश्मिरमधील अधिकाऱ्यांनी गुरूवारी दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीच्या छाप्यांमध्ये तपासकर्त्यांनी अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले. सोमवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी खोऱ्यातील दहशतवादी नेटवर्कविरूद्धच्या कारवाई तीव्र केल्या आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत एकूण 13 जणांना मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांनी काय सांगितले ( Delhi Bomb Blast Update )
अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांच्या चौकशीतून असे दिसून आले की त्यापैकी काही जण गेल्या वर्षभरात तुर्कीलाही गेले होते. स्फोटकांचा मोठा साठा जप्त केल्याप्रकऱणी डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी संबंधित तपासकर्त्यांनी आतापर्यंत 200 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे मॉड्यूल उघडकीस आले. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये 200 आणि श्रीनगरमध्ये 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.