Translate :

Sponsored

Delhi Bomb Blast British Advisory : ब्रिटनने जाहीर केली भारतात पर्यटन करण्यासाठी नवीन नियमावली, ‘या’ भागात प्रवास करण्यास केली सक्त मनाई : UK Indian Travel Advisory 2025 Safe Guidelines Issued

दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश सरकारने भारतात प्रवास करणाऱ्यांसाठी काही नियमावली जाहीर केली आहे.

Delhi Bomb Blast British Advisory : ब्रिटीश सरकारने भारतातील नागरिकांसाठी आणि पर्यंटकांसाठी एक नवीन पर्यटन सल्ला देणारी नियमावली जाहीर केली आहे. ज्यानुसार ब्रिटीश भारताच्या या भागांमध्ये जाण्यास सक्त मनाई केली आहे.

दिल्ली : 12/11/2025

ब्रिटन (Delhi Bomb Blast British Advisory ) सरकारने भारतात राहणाऱ्या किंवा भारतात प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक नीवन ट्रॅव्हल ॲडव्हायजरीत भारतातील एक नवीन ट्रॅव्हल ॲडव्हायजरी जाहीर केली आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी अपडेट केलेल्या या एडव्हायजरीत भारतातील काही भागांबद्दल सुरक्षितेतच्या दृष्टीने गंभीर इशारे देण्यात आले आहेत. विशेषतः भारत-पाकिस्तान सीमा, काश्मीर खोरे आणि मणिपूर राज्य या प्रदेशांमध्ये प्रवास कठोरपणे टाळावा, असा सल्ला युकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (FCDO) दिला आहे.

सीमावर्ती भाग धोकादायक घोषित ( Delhi Bomb Blast British Advisory )

एफसीडीओने स्पष्टपणे नमूद केले आहे की ब्रिटीश नागरिकांनी भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किलोमीटरच्या आत प्रवास करून नये, कारण हा भाग असुरक्षित घोषित करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मिरच्या बहुतांश भागात प्रवासावर निर्बंध लावण्यात आले असून, फक्त जम्मू शहरात आणि तेथून विमान प्रवास करण्यास परवानगी आहे. ॲडव्हायजरीत म्हटले आहे की या भागातील सुरक्षा परिस्थिती कधीही बिघडू शकते, त्यामुळे प्रवाशांनी पूर्ण खबरदारी बाळगावी.

काश्मिरमधील पर्यटन स्थळांनाही इशारा  ( Delhi Bomb Blast British Advisory )

गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर शहरासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थलांवरही प्रवास करण्याविरूद्ध इशारा देण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हालचालीदरम्यान सुरक्षा दलांकडून तपासणी वाढवण्यात आली आहे. एफसीडीओने नमूद केले आहे की, काश्मिर खोऱ्यातील परिस्थिती अस्थिर असून, हिंसक घटना अचनाक घडू शकतात.

मणिपूर अजूनही अस्थिर  ( Delhi Bomb Blast British Advisory )

सल्लागारात मणिपूर राज्याबद्दलही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. 2023 मध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर या राज्यात अजूनही कर्फ्यू आणि निर्बंध लागू आहेत.य मे ते जुलै 2025 दरम्यान पुन्हा काही हिंसक संघर्ष घडल्याचे नमूद करत, एफडीडीओने ब्रिटीश नागरिकांना “अनावश्यक प्रवास टाळा” असा स्पष्ट सल्ला दिला आहे.

विमा आणि प्रवास नियम  ( Delhi Bomb Blast British Advisory )

ब्रिटन सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, जर एखादा प्रवासी एफसीडीओच्या इशाऱ्याच्या विरोधात प्रवास करतो तर त्याचा प्रवास विमा अवैध ठरू शकतो. वाघा-अटारी सीमा क्रॉसिंगही सध्या बंद असल्याने, त्या मार्गाने जाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे.

महिला आणि LGBTQ प्रवाशांसाठी विशेष सूचना ( Delhi Bomb Blast British Advisory )

एफसीडीओने महिला प्रवासी, LGBTQ प्रवासी आणि एकट्या प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. भारतातील सामाजिक आणि सांंस्कृतिक भिन्नता लक्षात घेता, त्यांनी स्थानिक परिस्थिती, वाहतूक, पोलिस मदत आणि योग्य विमा याबाबत तयारी ठेवावी असा सल्ला देण्यात आला आहे.

आप्तकालिन सूचना (Delhi Bomb Blast British Advisory)

ब्रिटन सरकारने प्रवाशांना वेळेवर माहिती मिळवण्यासाठी एफसीडीओच्या ईमेल अलर्टस आणि “Travel Aware” सोशल मीडिया अकांऊटस (X, Facebook, Instagaram) फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आप्तकालिन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक माध्यमांवरील बातम्यांवर सतत लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आले आहे. ब्रिटन सरकारने शेवटी नमूद केले आहे की, “कोणताही प्रवास पूर्णपणे सुरक्षित नसतो”. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या गंतव्यस्थळावर आधारित योग्य विमा आणि तयारी ठेवणे आवश्यक आहे.” या सल्लामुळे भारतात पर्यटन किंवा व्यावसायिक प्रवासाची योजना आखणाऱ्या अनेक ब्रिटिश नागरिकांनी आपल्या योजना तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored