Translate :

Sponsored

Delhi Blast Update, Breaking news : दिल्लीतील घटना हा स्फोट की दहशतवादी हल्ला ? पोलिसांकडून धक्कादायक माहिती, मोठी माहिती समोर : Delhi Red Fort Car Blast Is Terrorist Attack Said Delhi Police

दिल्लीमध्ये झालेला भीषण स्फोट हा अपघात होता की दहशतवादी हल्ला ? याचा तपास सुरू झाला आहे.

Delhi Blast Update : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात घडलेल्या वाहनाच्या स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. जाणून घेऊ अधिक माहिती.

दिल्ली : 10/11/2025

दिल्लीच्या (Delhi Blast Update) लाल किल्ला परिसरात घडलेल्या वाहनाच्या स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेनंतर एका संशियताला ताब्यात घेण्यात आले असून हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आज संध्याकाळी 6:45 मिनिटांनी एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर इतरही आठ ते दहा कारमध्ये स्फोट झाला. यात आतापर्यंत एकुण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार चालू आहेत. स्फोटाची ही माहिती मिळताच महाराष्ट्रात मुंबई, पुणे शहरातील पोलीस हायअलर्टवर आहेत.

दहशवाती हल्ला असल्याचा संशय (Delhi Blast Update)

दिल्लीतील गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा वाहनाची बॅटरी फुटली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून काही प्रथमरदर्शनी अंदाज लावले आहेत. हा कारचा स्फोट नसून दहशतवादी कट असल्याता संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता दहशतवादी हल्ल्याच्या अंगानेही या घटनेचा तपास केला जाणार आहे.

दिल्ली पोलीस सक्रिय, पुरावे जमा करण्याचे काम सुरू (Delhi Blast Update)

या स्फोटात आतापर्यंत एकुण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर एनआयए, बॉम्बशोधक पथक, अग्निशमक दल तसेच इतर सर्व तपाससंस्था घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरते पुरावे जमा केले आहेत. या पुराव्यांचा अभ्यास करून स्फोटाचे नेमके कारण काय याचा शोध घेतला जाणार आहे.

पोलिसांना नेमके काय सांगितले ? (Delhi Blast Update)

ताज्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही घटना समोर येताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नेमका स्फोट कसा झाला ? याबाबत सविस्तर सांगितले आहे. स्फोट झालेली गाडी अगदी हळूहळू पुढे जात होती. रस्त्यावर सिग्नल लागल्यानंतर ही गाडी थांबली. या गाडीमध्ये काही प्रवासीही होते. याच गाडीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे गाडीच्या आजूबाजूच्या गाड्यांमध्येही स्फोट झाला. ही घटना समजताच पोलीस, एनआयए, एनएसजी तसेच इतर सर्व तपाससंस्था घटनास्थळी दाखल झाल्या, अशी माहिती या पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored