Translate :

Sponsored

Delhi Blast Update, Shocking News, 2025 : दिल्ली स्फोट हा आत्मघाती हल्लाच, CCTV फुटेज आले समोर, स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर असल्याचा संशय : Delhi Red Fort Metro Station Blast CCTV Footage Terrorist Umar Faridabad

दिल्ली स्फोट हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (फोटा-सोशल मीडिया)

Delhi Blast Update : राजधानी दिल्लीत काल भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशभरात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. या स्फोटाचा तपास अत्यंत वेगाने केला जात आहे. वाचा अधिक माहिती.

दिल्ली : 11/11/2025  

काल राजधानी दिल्ली आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना (Delhi Blast Update) घडली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट होण्याआधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये कार चालवणारा व्यक्ती तोंडाला मास्क लावून चालवत असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत झालेला हा स्फोट (Delhi Blast Update) हा आत्मघाती म्हणजेच दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा यंत्रणेने या दृष्टीने तपास सुरू केला आहे. हा स्फोट होण्याआधी या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामधून ही आय 20 गाडी जाताना दिसून येत आहे. या कारमध्ये एक माणूस काळा मास्क लावून गाडी चालवत असल्याचे दिसून येत आहे.

गाडीत असणारा माणूस हा दशहतवादी मोहम्मद उमर नावाचा व्यक्ती असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. ही गाडी होण्याआधी जवळपास दोन ते तीन तास लाल किल्ल्याजवळच्या परिसरात उभी असल्याचे म्हटले जात आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

सुरक्षा यंत्रणा सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करत आहे. या फुटेजमधून आय 20 कार जाताना दिसून येत आहे. यात मास्क घातलेला माणूस दिसून येत आहे. या व्यक्ती दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणा तांत्रिक दृष्टीने या चेहऱ्याती ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. स्फोट झालेली कार हरियणामधील असल्याचे समोर आले आहे.

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची ? (Delhi Blast Update)

राजधानी दिल्लीत काल भीषण स्फोट (Delhi Blast Update) झाला. त्यानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच देशभरात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. या स्फोटाचा तपास अत्यंत वेगाने केला जात आहे. पोलिसांनी स्फोटात वापरण्यात आलेल्या गाडीचा शोध लावला आहे. स्फोट करण्यासाठी हरियणामधील गाडीचा वापर करण्यात आला आहे.

या स्फोटाक वापरण्यात आलेली कार हरियाणा राज्यातील मोहम्मद सलमान या व्यक्तीची समोर आले आहे. याची माहिती समोर येताच पोलिसांनी या कार मालकाला ताब्यात घेतल्याचे समजते आहे. या कार मालकाची चौकशी सुरू असल्याचे समजते आहे. दरम्यान मोहम्मद सलमान या व्यक्तीने त्याची गाडी दुसऱ्या माणसाला विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored