Delhi Blast News : प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट एका इको व्हॅनमध्ये झाला होता, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली. या स्फोचामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत निर्माण झाली.
दिल्ली : 10/11/2025
रविवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण स्फोटाने (Delhi Blast News) संपूर्ण शहर हादरले. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेक गंभीर जखमींना एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट एका इको व्हॅनमध्ये झाला होता, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घाबराट आणि दहशत निर्माण झाली. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.
माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच पथक, एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि बॉम्ब निकामी पथकाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत, तर तपास यंत्रणा हा स्फोट दहशतवादी कट होता का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
घटनेचे ठिकाण लाल किल्ला आणि चांदणी चौक यासारख्या गर्दीच्या ठिकाणांजवळ असल्याने, सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात अलर्ट जाहीर केला आहे. सध्या, पोलीसांनी आजूबाजूचे रस्ते बंद केले आहेत आणि लोकांना परिसरात येऊ नये असे आवाहन केले आहे.
गृहमंत्र्यांची आयबी प्रमुखांशी चर्चा (Delhi Blast News)
लाल किल्ला स्फोटानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थीतीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी गुप्तचर विभागाच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांनी सुरक्षा यंत्रणांना प्रत्येक बाजूने चौकशी करण्याचे आणि कोणत्याही संकेतांकडे दुर्लक्ष न करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणताही छेडछाड सहन कली जाणार नाही अशे गृहमंत्र्यांनी सांगितले.
कार स्फोटाबाबत गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली पोलिस आयुक्तांशी चर्चा (Delhi Blast News)
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमींच्या उपचारांसाठी संपूर्ण व्यवस्था करण्याचे आणि कटाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत
दिल्ली बॉम्ब स्फोटाप्रकरणी सर्व माहिती जाणून घ्या या पेज वर