Translate :

Sponsored

DCM Sunetra Pawar, Great News : महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत उच्चशिक्षित, जाणून घ्या त्यांच्याविषयी.. : DCM Sunetra Pawar Information

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण निर्माण झाला आहे. ही घटना एका दुदैर्वी घटनेतून निर्माण झाली असली तरी, तिचे वेगळे असे महत्त्व आहे. महाराष्ट्राला सुनेत्रा पवार यांच्या निमित्ताने एक महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. जाणून घेऊयात त्यांचा अल्पपरिचय.

DCM Sunetra Pawar : 31-01-2026

          गेल्या पाच सहा दिवसात महाराष्ट्रातील राजकारणाने एक वेगळेच आणि अकल्पित वळण घेतले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सगळा महाराष्ट्र कोलमडून पडला आहे. अजितदादा गटात्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोक आणि पक्षाविषयीची धाकधूक स्पष्ट दिसत आहे. अशावेळी दुःखातही एक वेगळी घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासत घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्राने आत्तापर्यंत एकही महिला उच्चपदावर बघितली नाही. मात्र दुर्दैवाने का असेना पण महाराष्ट्राला प्रथमच एक उच्चशिक्षित महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. दादांच्या निधनानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar)   यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे आली आहेत.

       राज्याच्या या महिला उपमुख्यमंत्र्यांना आजवर जनता, एक सामाजिक कार्य करणाऱ्या, अजितदादांच्या पाठीमागे खंबिरपणे त्यांचा संसार सांभाळत उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी म्हणून परिचित आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी खासदार ही भूमिकाही सांभाळली आहे. अशा या सुनेत्रा पवार यांचा शैक्षणिक आणि राजकीय प्रवास जाणून घेऊ.

सुनेत्रा पवार यांच्याविषयी  (DCM Sunetra Pawar)

सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचा. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक म्हणूनच त्यांची ओळख होती. अशा सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या घरात सुनेत्रा पवार यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे कुटुंब शेतीव्यवसाय करणारे आहे. सुनेत्रा पवार यांनी एप्रिल एप्रिल 1983 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एस.बी.आर्टस अँड कॉर्मस कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथून पदव्यूत्तर पदवी घेतली. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरण संबंधित कोर्सही केले आहेत. याशिवाय पुस्तकं वाचणे, फोटोग्राफी आणि चित्रकला हे त्यांचे छंद आहे.

सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवासाची सुरूवात  ( DCM Sunetra Pawar )

सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात 18 जून 2024 रोजी त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यपदाने झाली. संसंदेच्या वरिष्ठ सभागृहात त्या तेव्हापासून सक्रिय भूमिका बजावू लागल्या. राजकारणापूर्वी सुनेत्रा पवार सामाजिक आणि संस्थात्मक कामांमध्ये सक्रिय होत्या. त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) च्या अध्यक्ष आहेत. याशिवाय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यही त्या होत्या. अनेक कृषी आणि शिक्षण संबंधित संस्थामध्ये त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.

अशा हुरहुन्नरी, उच्चशिक्षित आणि सामाजिक, राजकीय वारसा असणाऱ्या महिलेची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. दादांच्या कार्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच. त्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी उत्तम काम करतील याची जनतेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored