Translate :

Sponsored

Daya Dongare passes Away, Sad News : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा ! : Actress Daya Dongare Passess Away At the Age Of 85

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन.

Daya Dongare passes Away : मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून खाष्ट सासू आणि खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन झाले आहे.

मुंबई : 03/11/2025

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. रूपेरी पडद्यावर खाष्ट सासू आणि खलनायकी व्यक्तिरेखा साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला होता.

दया डोंगरे यांच्याविषयी  (Daya Dongare passes Away)

11 मार्च 1940 रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना लहाणपणापासूनच संगीत आणि अभिनय याची आवड होती. त्यांनी शालेय जीवनातच शास्रीय आणि नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांची आई यमुताई मोडक या अभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता.

1990 नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रापासून दूर रहाणे पसंत केले. मराठी चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानाची आठवण प्रेक्षकांना कायम राहील अशीच आहे. त्यांच्या निधनाची माहिती चित्रपट समिक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रूपेरी पडद्यावर ‘खाष्ट सासू’ आणि नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या दया डोंगरे यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपली ओळख निर्माण केली.

दया डोंगरे यांची कारकिर्द (Daya Dongare passes Away)

दया डोंगरे यांच्या गाजलेल्या भूमिकांपेैकी ‘चार दिवस सासूचे’, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून, उंबरठा, मायबाप, कुलदिपक यांसारख्या मराठी चित्रपटांचा तसेच स्वामी या लोकप्रीय मालिकेचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. अभिनयाव्यतिरिक्त दया डोंगरे यांना गायनाचीही विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांनी शास्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि मूळतः त्यांना गायन क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यांच्या आई यमुताई मोडक या अभिनेत्री तर आत्या शांता मोडक या प्रसिद्ध गायिका होत्या. दया डोंगरे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored