Translate :

Sponsored

Dalai Lama Press Release, Shocking News 2026 : Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामांनी दिली प्रतिक्रिया, धर्मशाळेकडून कडक शब्दांत उत्तर : Spiritual Leader Dalai Lama Press Release Regarging Name Being Mentioned In Epstein Files

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामांनी दिली प्रतिक्रिया, धर्मशाळेकडून कडक शब्दांत उत्तर

Dalai Lama Press Release : तिबेटी अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांचे नाव वादग्रस्त एपस्टीन फाईल्समध्ये आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून त्यांच्या धर्मशाळेेने प्रेस रिलीज काढली आहे.

हिमाचल प्रदेश : 08-02-2026 

सध्या संपूर्ण जगात एपिस्टीन फाईल्सच्या अनेक खळबळ जनक खुलाशांमुळे (Jeffrey Epstine) खळबळ माजली  आहे. लैंगिक अत्याचाराशी संबंधित या प्रकरणामध्ये ताकदवान नेते, सेलिब्रिटी आणि अनेक प्रसिद्ध लोकांची नावे समोर आली आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, शांतीचे प्रतीक मानले जाणारे तिबेटी आध्यात्मिकक गुरू दलाई लामा यांचे नाव देखील या वादग्रस्त फाईल्समध्ये असल्याचा दावा केला जात आहे. यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील दलाई लामा यांच्या कार्यालयाने आता  (Dalai Lama Press Release) अधिकृत स्पष्टिकरण जाहीर केले आहे.

एपस्टीन फाईल्सने जागतिक राजकारण आणि ग्लॅमर जगतातील दिग्गजांची झोप उडवली आहे. अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या जेफ्री एपस्टाईनच्या गुप्त फायलींमध्ये अनेकांची नावं आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, दलाई लामा यांच्या कार्यालयाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मीडिया रिपोर्टस् आणि सोशल मीडियावर त्यांचे नाव कुख्यात लैंगिक गुन्हेगार आणि मानवी तस्करी जैफ्री एपस्टाईनशी जोडल्याच्या दाव्यावर कडक शब्दांत इशारा दिला आहे. धर्मशाळेतून जाहीर केलेल्या प्रेस रिलिजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की परमपुज्य 14 वे दलाई लामा कधीही जेफ्री एपस्टाईन यांना भेटले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे धर्मशाळेकडून सांगण्यात आले आहे.

“कधीही भेटलो नाही, कधीही परवानगी दिली नाही” – धर्मशाळेने केले स्पष्ट  (Dalai Lama Press Release)

दलाई लामांनी त्यांच्या वतीने कोणालाही एपस्टाईनशी भेटण्याची किंवा बोलण्याची परवानगी कधीही दिली नाही याची पुष्टीही या निवेदनात करण्यात आली आहे. कार्यालयाने या अहवालांना “पुर्णपणे दिशाभूल कऱणारे आणि निराधार ” म्हटले आहे, ते दलाई लामांना चुकिचे चित्रित करण्याचा प्रयत्न आहे, असे देखील या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, ‘एपस्टीन फाइल्स’ संबंधी काही अलीकडील माध्यमांतील अहवाल आणि सोशल मीडियावरील पोस्ट परमपूज्य दलाई लामा यांनी जेफ्री एपस्टीन यांची कधीही भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्या वतीने कोणालाही त्यांच्याशी भेटण्याची किंवा संवाद साधण्याची परवानगी दिलेली नाही, असे धर्मशाळोकडून सांगण्यात आले आहे.

जेफ्री एपस्टाईनमुळे कोणते सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात ? (Dalai Lama Press Release)

जेफ्री एपस्टाईन हा एक हाय-प्रोफाइल न्यूयॉर्कर होता, त्याच्यावर 2005 मध्ये पहिल्यांदा आरोप लावण्यात आला होता. 2019 मध्ये, त्याला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली, परंतु कोठडीत असताना त्याने आत्महत्या केली. एपस्टाईन त्याच्या हाय-प्रोफाईल पार्ट्यांसाठी ओळखला जात असे, ज्यात जगातील सर्वात प्रभावशाली लोक उपस्थित रहात असत. एपस्टाईनच्या फायलींमधून अनेक प्रमुख व्यक्तींची नावे आणि फोटो उघड झाले आहेत, ज्यात शास्रज्ञ स्टीफन ह़ॉकिंग, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि पॉप स्टार मायकल जॅक्सन यांचा समावेश आहे. आणखी कोणाची नावे बाहेर येतात हे जगासाठी खुप धक्कादायक ठरणारे आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored