Translate :

Sponsored

Crime News, Don’t Fall Pray to Cheap Housing Advertising, 1 Crore 7 Lakh Scame In Mumbai : स्वस्तात घर देतो सांगून, 1 कोटी 7 लाखांचा गंडा, 3 BHk फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष .

Crime News: सोशल मीडियावरील एका जाहिरातीला भूलून एका व्यक्तीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका जाहिरातीला बळी पडून एका घरासाठी तब्बल 1 कोटी 7 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. 

मुंबई : 2025-06-21

 मुंबईत स्वस्तात घर मिळवून देण्याच्या एक जाहिरातीच्या माध्यमातून तब्बल 1 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही जाहिरात फेसबुकवर टाकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोगेश्वरी येथील एका इसमाने या जाहिरातीला बळी पडून स्वस्त घराच्या मोहापोटी तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये गमावले. विशेष म्हणजे या भामट्यांच्या जाळ्यात सापडलेल्या फिर्यादीने तब्बल 250 वेळा ऑनलाईन व्यवहार करून ही रक्कम दिली होती. सायबर पोलिसांनी याप्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केली आहे.

फेसबुकवरील ती जाहिरात

सदर प्रकरणामध्ये फसवणुकीला बळी पडलेली व्यक्ती 43 वर्षांचे असून जोगेश्वरी येथे राहतात. पीडित व्यक्तीला दक्षिण मुंबईत प्रशस्त घर हवे होते. ही व्यक्ती दक्षिण मुंबईमध्ये स्वस्तात घर शोधत होती. दरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांना फेसबुकवर ‘अपना घर अपने सिटी मे’ अशा आशयाची एक जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी स्वस्तात घरे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. इच्छूकांनी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलेलं.

दोन व्यक्तींच्या माध्यमातून सुरु झाली फसवणूक

फिर्यादी व्यक्तीला ज्या फेसबुक पेजवरुन जाहिरात पोस्ट करण्यात आलेली ते पेज आणि ती जाहिरात खरी वाटली. फिर्यादीला दादरमध्ये तीन खोल्यांचे घर हवे होते. त्यामुळे फिर्यादीने जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादींना एक अर्ज पाठविण्यात आला. तो अर्ज भरल्यानंतर फिर्यादींना त्यांची फाईल मंजूर झाल्याचा एक ई-मेल पाठविण्यात आला. पुढील प्रक्रियेसाठी विशाल पांचाळ या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. काही दिवसात त्यांना वीरेंद्र मेहता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण ‘अपना घर’ प्रकल्पाचे संचालक असल्याचे सांगितले आणि फिर्यादींना कमी किंमतीत दादरमध्ये तीन खोल्याचे घर मंजूर झाल्याचे सांगितले.

250 वेळा ऑनलाईन पैसे पाठवले

सुरुवातीला तक्रारदाराकडून नोंदणी शुल्क म्हणून 50 हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फिर्यादींची फसवणूक करण्यात आली. म्हाडा मंजुरी, महापालिकेचा ‘ना हरकत दाखला’, मंत्रालयातून मंजुरी अशा विविध कारणांसाठी पैसे मागण्यात आले. नोव्हेंबर 2018 ते नोव्हेंबर 2024 या सात वर्षांच्या कालावधीत फिर्यादींकडून 1 कोटी 7 लाख रुपये घेण्यात आले. तब्बल 250 वेळा फिर्यादींनी ऑनलाईन व्यवहार करून आरोपीला पैसे पाठवले.

फसवणूक झाल्याचं कसं समजलं?

दरम्यान, महापालिकेचा प्रभाग अधिकारी दीपकला अंतिम मंजुरीसाठी 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे विशाल पांचाळने सांगितले. त्यानुसार फिर्यादी वांद्रे येथे दीपक नावाच्या व्यक्तीला भेटले आणि 10 लाख रुपये दिले. मात्र तरीही घर मिळाले नाही. पुन्हा आरोपींनी फिर्यादीकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. फिर्यादींनी एका मित्राकडे पैशांची मागणी केली. मित्राने एवढे पैसे कशाला हवे अशी विचारणा केल्यानंतर फिर्यादींनी घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी या मित्रानेच फिर्यादीला तुझी फसवणूक होत असल्याची जाणीव करुन दिल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored