Cough Syrup Ban : देशभरातील पालकांनी सध्या कफ सिरपच्या औषधांचा धसका घेतला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभमूीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई केली आहे. ‘रेसपिफ्रेश टी आर’ या खोकल्याच्या औषधाचा साठा जप्त केला आहे. केंद्र सरकारने 2 वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचा निर्देश दिले आहेत. FDA कंपन्या आणि औषधांची कसून तपासणी करत आहे.
पुणे : 08/10/2025
देशभरात सध्या पावसामुळे लहानमुलांना सर्दी, खोकला यांसारखे त्रास होताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून कफ सिरप लहान मुलांना दिले जाते. मात्र सध्या या औषधामुळे सर्व पालकांना धास्ती बसली आहे. कारण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक लहान बालकांनी आपला जीव गमवला आहे. अनेक राज्यात यावरून धडा घेत कफ सिरप (Cough Syrup Ban) या औषधावर बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्लानंतर छत्तीसगड राज्य सरकारने देखील दोन वर्षांच्या पेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी-पडसे यासाठी कफसिरप देण्यावर बंदी घातली आहे. कफ सिरप लहान मुलांच्या जीवासाठी योग्य ठरत नसल्याने आता महाराष्ट्रात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे म्हणजेच कऱ सिरपमुळे 19 बालकांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीवर संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. FDA ने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील ‘रेसपिफ्रेश टी आर’ ( Respifresh TR) या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे. FDA कडून नुकतीच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कंपन्या आणि औषधांची तपासणी सुरू (Cough Syrup Ban)
देशभरातील विविध राज्यांमध्ये बालकांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. कफ सिरपचे प्राशन केल्याने अनेक निरागस मुलांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतप राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मीती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सूरू केली आहे. मेडीकल स्टोअर्स आणि सरकारी रूग्णालयांकडून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली आहे. मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही असही हुकारे यांनी सांगितले.
पालकांना आवाहन (Cough Syrup Ban)
दोन वर्षांच्या खालील वय असलेल्या बालकांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप म्हणजेच खोकल्याचे औषध दिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे हुकरे यांनी नमुद केले आहे. सर्वसामान्य जनतेनेही डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधं (Cough Syrup Ban) घेऊ नयेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील तपासणी सुरू केली आहे. औषध निर्मिती कारखाने आणि उत्पादनांची तपासणी करण्यासाठी औषध निरीक्षकांची पथकं नेमण्यात आली आहेत. औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर शासनाने लक्ष आहे.