Corona Update : देशात कोरोनाच्या ॲक्टिव्ह केस सतत वाढत असताना, एक चांगली बातमी आहे. कालपासून केसेस वाढण्याचा हा वेग कमी झाला आहे. मागत्या चोवीस तासात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 7154 इतकी आहे.
नवी दिल्ली : 2025-06-14
कोरोनाबाबत कित्येक दिवसांनंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात नवीन कोरोना केसेसची संख्येत घट दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिथे कोरोनाच्या दररोज किमान नविन 300 केस समोर येत होत्या, तिथे आता 24 तासात 140 केस समोर येत आहेत. एक दिवसात एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या वाढच्या रूग्ण संख्येमुळे प्रशासनाकडून सातत्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाचा नवा व्हेरियंट हा जास्त धोकादायक नाही. मात्र आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला खोकला-सर्दी, ताप असे लक्षणं असतील, तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा.
देशभरात 7000 पेक्षा जास्त कोरोना रूग्णसंख्या
देशभरात कोरोना रूग्णसंख्या 7154 इतकी झाली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण 77 आहे. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये याचा सर्वात जास्त प्रादुर्भव आहे. महाराष्ट्रात मृत्यूची संख्या 18 झाली आहे, तर केरळ मध्ये अत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून लोकांना सावधान रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतर्क राहून, आवश्यक तेथे मास्कचा वापर करत, सोशलडिस्टेसिंग पाळण्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यांना सतर्कतेचा इशारा
कोरोनामुळे सर्व राज्यांना सतर्क रहाण्याचे सांगण्यात आले आहे. याविषयीचे सर्व निर्देश सरकारने आधीच दिले आहे. रूग्णालयांना कोरोना रूग्णांसाठी वेगळे वॉर्ड राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सॅंपल आणि टेस्ट घेण्याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत.