Translate :

Sponsored

Corona Cases Update, The Country Active Cases Crossed 4 Thousand : देशात कोरोना ॲक्टीव्ह केसेस 4 हजारच्यावर, मात्र आरोग्य यंत्रणा सज्ज, काळजीचे कारण नाही.

Corona Cases Update : देशात कोरोना केसची संख्या दररोज वाढत आहे. ॲक्टिव केसची संख्या 4026 इतकी झाली आहे. गेल्या चार दिवसातील मृतांचा आकडासुद्धा वाढला आहे. यासगळ्यात प्रशासन सज्ज आहे का ? असा प्रश्न पडतो. 

आरोग्य : 2025-06-03

देशात कोरोना व्हायरसने संक्रमीत रूग्णांची संख्या 4026 इतकी झाली आहे.  यामधील सर्वात जास्त रूग्ण हे महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील आहेत. केरळ मध्ये सर्वात जास्त 1416 केस आहेत, तर महाराष्ट्रात 494 रूग्ण आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशभरातून अत्तापर्यंत सुमारे 2700 रूग्ण उपचाराने बरे झाले आहेत.

कोरोनामुळे  (Corona Cases )अत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 31 जणांचा मृत्यू हा गेल्या चार दिवसात झाला आहे. महाराष्ट्रात मृतांचा आकडा सर्वात जास्त 10 इतका आहे. सोमवारी 70 वर्षांच्या एका वृद्धाचा आणि 73 वर्षांच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मागच्या चोवीस तासात केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि गुजरात येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात 494 ॲक्टिव्ह केस

महाराष्ट्रात कोविड-19 ने संक्रमित असणारे 59 नवीन रूग्ण आढळले आहेत. ज्यातील 20 एकट्या  मुंबईतील आहे. जानेवारीपासून अत्तापर्यंत एकुण कोरोना रूग्ण संख्या 873 इतकी झाली आहे. आरोग्या विभागाने दिलेल्या आकडेवाडीनुसार, जानेवारी 2025 पासून राज्यात एकुण 12 हजार 11 इतक्या रूग्णांची कोरोना चाचणी केली. त्यातील 494 ॲक्टिव केसेस निघाल्या. त्यातील 369 रूग्ण बरे झाले आहेत. 

सध्या नवीन 20 रूग्णांपैकी 20 मुंबईमधील, 17 पुणे जिल्ह्याच्या जवळील आणि चार ठाणे अशा परिसरातील आहेत. राज्यात रूग्णांमध्ये कोवीड-19 चे साधारण लक्षणं आढळून येत आहेत. आरोग्या विभागांकडून योग्य उपचार आणि तपासणी केली जात आहे. 

मुंबई आरोग्य विभागाने सांगितले की, एक जानेवारी पासून आतापर्यंत कोवीड -19 च्या एकुण 483 केस समोर आल्या आहेत. यातील सर्वात जास्त संख्या ही मे महिन्यातील आहे.

दिल्लीत रूग्णालये सज्ज 

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील आरएमएल, सफदरजंग आणि दुसऱ्या रूग्णालयांमध्ये तयारी सुरू केली आहे. मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या हे चिंतेचे कारण नाही. कारण कोणत्याही रूग्णांमध्ये कोविडची गंभीर लक्षणं आढळून येत नाहीत. तरीही आरएमएल हॉस्पिटलमध्ये 9 विलगीकरण कक्षांची तयारी केली आहे. 

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी म्हटले आहे की, कोविडची ही साथ अजून संपलेली नाही. अजूनही कोवीड सक्रिय आहे. कोर्टाने केंद्र सरकारकडून रूग्णांचे नमुने गोळा करणे, केंद्र आणि ट्रान्सपोर्ट पॉलिसी या सगळ्याची काय तयारी केली जात आहे याविषयीचा अहवाल मागवला आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज -केंद्र सरकार

केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे की,  आरोग्य विभाग संपूर्ण तयारीनीशी सज्ज आहे. आम्ही सगळ्या राज्यांच्या परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहे. संबधित मंत्री आणि विभाग प्रमुखांशीही आम्ही संपर्कात आहोत. मागच्या कोविडच्या लाटेच्या वेळी जे ऑक्सिजन प्लांट, अतिदक्षता विभागासारख्या सुविधा उभारल्या गेल्या होत्या त्यांची पुर्नतपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थीला तोंड देण्याची तयारी झालेली आहे. 

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored