Translate :

Sponsored

CommonWealth games 2030, Great News : भारताला राष्ट्रकुल 2030 स्पर्धेच्या यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार का ? जाणून घ्या काय आहे माहिती : Indias Bid To Host 2030 Commonwealth games To Receive Formal Approval At General Assembly

भारताला 2030 च्या राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद मिळण्याची औपचारीक घोषणा लवकरच होणार आहे.

CommonWealth games 2030 : पुढील राष्ट्रकुल स्पर्धा आता 2030 मध्ये होणार आहेत. त्या कोणत्या देशात भरवण्यात येणार याचे भवितव्य ठरणार आहे. भारत या स्पर्धेचे यजमानुद भूषवू शकतो, असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. याचा निर्णय आज (बुधवार 26 नोव्हेंबरला) ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महासभेत औपचारिक मान्यता दिली जाणार आहे.

ग्लासगो : 26/11/2025

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CommonWealth games 2030) चे यजमानपद हक्क मिळवण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात येणार आहे. या स्पर्धेते यजमानपद मिळवण्यासाठीची औपचारीक मान्यता ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महासभेत देण्यात येणार आहे. ही स्पर्धा देशात भरवणे ही देशासाठी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे देशाला जगातील बहु-क्रिडा केंद्र बनवण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यापूर्वी भारताने 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा दिल्लीत आयोजित केल्या होत्या. 2030 ची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. ज्याने गेल्या दशकात आपल्या क्रीडा पायाभूत सुविधांना नवीन उंचीवर नेले आहे. बुधवारच्या महासभेत राष्ट्रकुल क्रीडा महामंडळाच्या शिफारशींना औपचारीक मान्यता दिली जाईल.

कशी होते यजमानपद भूषविणाऱ्या देशाची निवड  (CommonWealth games 2030)

राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांकन समितीच्या देखरेखीखाली झालेल्या प्रक्रियेनंतर या शिफारशी करण्यात आल्या. यजमान शहरांचे मूल्यांकन तांत्रिक वितरण, खेळाडूंचा अनुभव, पायाभूत सुविधा प्रशासन आणि राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांशी सुसंगतता “या आधारावर करण्यात येते. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कऱण्यासाठी भारताला नायजेरियातील अबुजा येथून स्पर्धा होती. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मंडळाने 2034 च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी अफ्रिकन शहराचा विचार करण्याच निर्णय घेतला.

राष्ट्रकुल क्रीडा संघनेने जाहीर केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, जनरल असेंब्ली दरम्यान, राष्ट्रकुल सदस्या 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कऱण्याबाबत अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर भारताकडून अहमदाबादचे सादरीकरण केले जाईल. औपचारीक घोषणा भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:30 होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व संयुक्त सचिव ( क्रीडा ) कुणाल, आयओए अध्यक्ष पी.टी. उषा आणि गुजरातचे क्रीडा मंत्री हर्षा संघवी यांच्यासह इतर करतील.

2026 ऑलिंपिकचे यजमानपद  (CommonWealth games 2030)

भारतासाठी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणे देखील मानाची गोष्ट आहे. कारण भारत 2036 च्या ऑलिंपिक खेळांच्या यजमानपदाच्या शर्यंतीत आहे. राष्ट्रकुल खेळांचे अंतरिम अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रूकारे म्हणाले की, कार्यकारी मंडळाला बारत आणि नायजेरीया या दोन्ही देशांचे प्रस्ताव प्रेरणादायक वाटले, परंतु अखेर अहमदाबादची 2030 च्या खेळांच्या यजमानपदासाठी निवड झाली. अहमदाबादने अलिकडच्या काही महिन्यांत राष्ट्रकुल वेटविफ्टिंग चॅम्पियनशिप, आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा आणि एएफसी अंडर-17 आशियाई कप 2026 फुटबॉल पात्रता स्पर्धांचे आयोजन केले.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored