colours Marathi Baipan Jindabad : सासू-सून, भांडणं, कटकारस्थानं असे त्याच त्याच विषयांभोवती फिरणाऱ्या मालिकेमध्ये सध्या एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कोणती मालिका आहे ही, हे जाणून घेऊ.
मुंबई : 07/11/2025
सध्या कलर्स मराठी या वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नाव आहे या मालिकेचे ‘ बाईपण जिंदाबाद’. (colours Marathi Baipan Jindabad) प्रत्येक स्रीचं आयुष्य हे त्याग, समर्पण आणि जबाबदाऱ्यांनी विणलेल्या कहाण्या यात चित्रित केल्या केल्या आहेत. या नविन मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका वेगवेगळ्या एपिसोड मध्ये एक कथा अशा पद्धतीने चित्रित करण्यात आली आहे. अत्तापर्यंत दोन एपिसोड रिलिज झाले आहेत. पहिला भाग होता, तो एका बॉस आणि तिच्या असिस्टंटच्या नात्यावर. सुकन्या कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या अभिनयाचने सजलेली ही कथा प्रेक्षकांना आवडून गेली आहे.
बाईपण जिंदाबाद मालिकेच्या विविध कथा हे वैशिष्ट्य (colours Marathi Baipan Jindabad)
दुसरी कथा आहे मच्छी का पानी, सुचित्रा बांदेकर यांनी अभिनय केलेली ही कथा आहे मुलगा आणि आईच्या स्वप्नांची. अत्यंत ह्रदयस्पर्शी अशी ही कथा. लवकरच तिसरी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कथेचे नाव आहे ‘ आई रिटायर होतेय’ ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.
सध्या सर्व मराठी वाहिनीवर एकाच साच्यातील मालिका सुरू आहेत. बहुतेक सर्व कथानकं हे सासू-सून, कट कारस्थानं, मोठा एखादा बिजनेसमन, त्याचा श्रीमंत मुलगा किंवा मुलगी, त्याच्याविरोधात एक गरीब मुलगा-मुलगी त्यांच्यातील आधी भांडणं आणि मग प्रेम, त्यात अनेकजण करणारे कटकारस्थानं याच मार्गाने जाणाऱ्या सर्व मालिका आहेत. या सगळ्या मालिकेच्या रगाड्यात मनोरंजन विश्वात ‘बाईपण जिंदाबाद’ चे वेगळेपण सध्या दिसून येत आहे.
या मालिकेचा (colours Marathi Baipan Jindabad) सर्वात प्लस पॉईंट हा आहे की, त्यात अभिनय करणारे कलाकार. अत्यंत कसलेल्या कलाकारांनी अत्तापर्यंतच्या कथांमध्ये काम केले आहे. बाईपण जिंदाबाद च्या तिसऱ्या कथेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर शुभांगी गोखले या अनधा म्हणजे आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ही तिसरी कथा काय असणार आहे हे पहाणे उत्सूकतेचे असणार आहे. सर्व भारतीय घरात आई म्हणजे सर्वांच्या आयुष्याचा कणा असतो. मात्र ही आई जर आपल्या आईपणातून निवृत्ती जाहीर करते तेव्हा काय होते, या कथानकावर आधारित ही कथा आहे.