CM Devendra Fadanavis Raj Thackery Meeting : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राजकीय वर्तुळाच यावरून चर्चांना उधान आले आहे.
मुंबई : 2025-06-12
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (12 जून) मुंबईच्या एका हॉटेलमध्ये भेट झाली . मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्यांची भेट बांद्रा येथील ताज लैंडस हॉटेलमध्ये झाली आहे. सकाळी प्रथम राज ठाकरे तिथे पोहोचले. त्यानंतर 20 मिनीटांनी फडणवीस तेथे पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणे झाले हा सर्वांसाठीच चर्चेचा विषय आहे.
महापालिकेच्या निवडणुकांपुर्वीची ही भेट
राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंसह जाण्याचे संकेत दिले होते. असे असताना निवडणुकांपूर्वी अचानक भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घेत आहेत. यामुळे राजकिय चर्चांना उधान आले आहे. निवडणुकांआधी राज ठाकरेंसोबतची ही भेट बरचं काही सांगून जात आहे. यामुळे पुढील काळातील सत्तापालटांमध्ये राज ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावतील का ?
शिवसेना मनसे युतीच्या शक्यतांनाच विराम
काही दिवसांपूर्वीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच एकत्र येण्यावरून चर्चा सुरू होती. त्यामुळे मनसे आणि शिवसेना यांची युती होणार असे बोलले जात आहे. मात्र आजच्या ठाकरे आणि फडणवीस भेटीमुळे येत्या काळात फडणवीस यांच्यामुळे शिवसेना मनसे युतीच्या शक्यतांनाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. राजकीय तज्ञ आणि इतर पक्षांतील नेते सर्वांचे लक्ष या भेटीकडे आहे. त्यामुळे या भेटीत नक्की काय बोलणे झाले हे सर्वांसाठीच उत्सूकतेचा विषय ठरला आहे.