Translate :

Sponsored

CIJ Bhushan Gavai Attack : सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरच्या अडचणीच वाढ, फौजदारी कारवाई होणार : Rakesh Kishores Problems Will Increase Who Attacked CIJ Bhushan Gavai .

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरवर फौजदारी कारवाई होणार.

CIJ Bhushan Gavai Attack : 6 ऑक्टोबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार घडला. राकेश किशोर नावाच्या वकिलाना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर आता फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : 17/10/2025

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई (CIJ Bhushan Gavai Attack) यांच्यावर एका ज्येष्ठ वकिलाने बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. राकेश किशोर असे हल्ला करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वकील राकेश किशोर यांच्याविरोधात फौजदारी अवमानना कारवाई करण्यात येणार आहे. भारताचे ॲटर्नी जनरल आर.वेंकटरमणी यांनी राकेश किशोर यांच्याविरूद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.

सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला माहिती दिली आहे. भारताचे ॲटर्नी जनरल यांनी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्याविरूद्ध फौजदारी अवमान कारवाई सुरू करण्यास संमती दिली आहे.

एससीबीए अध्यक्ष विकास सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ॲटर्नी जनरल यांनी या प्रकारचा पूर्णपणे निषेध केला आहे. ‘राकेश किशोर यांच्या “कृती आणि विधान केवळ निषेधार्ह नाहीत तर सर्वोच्च न्यायालयाच्या वैभवाला आणि अधिकारालाही कमी करणारे आहे. राकेश किशोर यांचे वर्तन. ” न्याय वितरण व्यवस्थेच्या पायावर आघात करणार आहे. असही आर.वेंकटरमणी यांनी म्हटले आहे.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान घटलेला घटनाक्रम (CIJ Bhushan Gavai Attack)

6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याची प्रकार घडला. राकेश किशोर नावाच्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’ अशी नारेबाजीही त्यांनी केली.

त्यांनी केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यास किंवा या प्रकाराचा पश्चाताप नसल्याचेही स्पष्ट केले. पण या सर्व प्रकारादरम्यान मात्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शांत राहणे पसंत केले आणि कामकाजही सुरू ठेवले. ” अशा गोष्टींमुळे प्रभावित होणारा मी शेवटचा व्यक्ती आहे.” या सर्व गोष्टींमुले विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणान होत नाही.” असंही भूषण गवईंना स्पष्ट केले.

तथापि, या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने औपचारिक तक्रार दाखल केली नाही. सरन्यायाधीश गवई यांनी रजिस्ट्रीला त्या व्यक्तीविरूद्ध दंडात्मक कारवाई करू नये असे सांगितले. तरीही, दिल्ली पोलिसांनी राकेश किशोर यांची न्यायालयाच्या आवारात अनेक तास चौकशी केली त्यांनी नंतर त्यांना सोडून दिले. नंतर त्यांचे बूट परत करण्यास आले.

घटनेनंतर सीजेआयने काय म्हटले ?  (CIJ Bhushan Gavai Attack)

पण त्याचवेळी भूषण गवई यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे वर्णन ‘विसरलेला अध्याय’ म्हणून केले. सर्वोच्च न्यायालयात बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, “सोमवारी घडलेल्या घटनेने मी आणि माझे विद्वान बांधव खूप हादरले आहेत. हा आमच्यासाठी विसरलेला अध्याय आहे.”

ही एक अक्षम्य घटना – एसजी तुषार मेहता (CIJ Bhushan Gavai Attack)

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, “भूषण गवईवर होणारा हल्ला ही अक्षम्य घटना होती आणि या घटनेचा विचार करण्यात मुख्य न्यायाधीशांची महानता आणि उदारता दिसून येते.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored