Translate :

Sponsored

Chhatrapati Sabhajinagar Bank Employees Strike, Big News : बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलाय संप ! बँका झाल्या आहेत ठप्प ! काय आहेत संपाची कारणं ? : Bank Strike Schatrapati Sambhaji Nagar Demand Five Day Week

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलाय संप ! बँका झाल्या आहेत ठप्प ! काय आहेत संपाची कारणं ?

Chhatrapati Sabhajinagar Bank Employees Strike : छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांच्या आठवड्यासाठी लाक्षणिक संप पुकारला. यामुळे शहरात 600 कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

संभाजीनगर : 29-01-2026

पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ युनियन्स (यूएफबीयू) यांच्या वतीने मंगळवार, 27 रोजी बँकांकडून एक दिवसीय लाक्षणिक संप (Chhatrapati Sabhajinagar Bank Employees Strike) पुकारण्यात आला. या अनुषंगाने पंजाब नॅशनल बँक, अदालत रोज येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. या संपामुळे सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरात सुमारे 500 ते 600 कोटी रुपयांचे क्लिअरिंग व्यवहार ठप्प झाले आहेत.

यूएफबीयूचे कन्व्हेनर व बँक ऑफ महाराष्ट्राचे कॉ. राजेंद्र देवळे यांनी सूत्रसंचलन केले. एनसीबीचे ललित निकुंभ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी शारिरिक व मानसिक तणावाखाली आहेत. सुमारे 82 टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांना वर्क-लाईफ बॅलन्स नसल्यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष ( Chhatrapati Sabhajinagar Bank Employees Strike )

यानंतर आयबॉकचे कॉ. सतीश घुगे यांनी परदेशात चार दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चा सुरु असताना भारतात पाच दिवसांच्या आठवड्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. नोबोचे बँक ऑफ महाराष्ट्राचे अजय बोरसे व बँक ऑफ बडोद्याचे रवींद्र सुतवणे यांनी पाच दिवसांचा आठवडा आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले. यावेळी एसबीआयचे कॉ. राहुल साळुंखे, एमजीबीच्या कॉ. राजश्री वरूडकर, एनसीबीच्या एसबीआयच्या स्वाती चव्हाण तसेच एआयबीओएचे कों, निलेश खरात यांनी घोषणाबाजी करत सभेला पाठिंबा दिला.

आंदोलनाला यश मिळेल ( Chhatrapati Sabhajinagar Bank Employees Strike )

प्रमुख मार्गदर्शन कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी केले. हा लढा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी असून अत्तापर्यंत प्रत्येक संघर्षात बँक कर्मचाऱ्यांनी यश मिळवले आहे. या आंदोलनातही यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील टप्प्यात दोन दिवस, तीन दिवस किंवा बेमुदत संपांचा निर्णय शीर्ष नेतृत्व घेईल व त्याती अंमलबजावणी कर्मचारी पूर्ण ताकदीने करतील, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात अंदाजे 500 ते 600 कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored