Pune Metro Project : पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासाठी शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. त्याचाच टप्पा केंद्र सरकार आणि महामेट्रोने गाठला आहे. चांदणी चौक ते वाघोली पुणे मेट्रो कॉरिडॉरची संकल्पना मांडत, मार्ग विस्ताराला मंजूरी दिली आहे.
पुणे : 25/06/2025
केंद्रीय मंत्रीमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फेज-2 ला मंजूरी दिली आहे. वनाज ते चांदणी चौक (Corridor 2A) आणि रामवाडी ते वाघोली -विठ्ठववाडी (Corridor 2B) या सध्याच्या वनाज- रामवाडी कॉरिडॉर फेज-1 चा विस्तार कऱण्यात येणार आहे. या दोन एलिवेटेड कॉरिडॉरची लांबी 12.75 किमीचा असून त्यात 13 स्थानकांचा समावेश आहे. या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली उपनगरातील समन्वय वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम चार वर्षात पूर्ण करण्याची योजना आहे.
निधी मंजूरी
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 3626.24 कोटी रूपये इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी मंजूरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अर्धा खर्च आता राज्य सरकार देणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे प्रमख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांच्या समन्वयासाठी सोपे होणार आहे. या मार्ग विस्तारामुळे सार्वजनिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
या मेट्रो मार्गांच्या विस्ताराअंतर्गत शहराच्या इतर भागांना जोडून वाहतूर कोंडी सारख्या समस्यांवर तोडगा काढण्याक येणार आहे.