CBSC Board 10th Exam : सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयासंबंधी इयत्ता दहावीसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे.
दिल्ली : 25/06/2025
शिक्षण क्षेत्रासंबंधी मोठी बातमी आहे. आता इयत्ता दहावीच्या मुलांना वर्षातून दोन टप्प्यात बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएससी ( CBSC Board 10th Exam) बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही काळापासून या निर्णयाबाबत चर्चा सूरू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे.
फेब्रुवारी आणि मे अशा दोन टप्प्यात होणार परीक्षा (CBSC Board 10th Exam)
सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 च्या शैक्षणिक वर्षापासुन लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यात इयत्ता दहावीच्या मुलांच्या परीक्षा होणार आहेत. त्यासंबंधीच्या इतर नियम लवकर बोर्ड जाहीर करणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.