Caste Census Gazette Notification : गृहमंत्रालयाकडून जातिनिहाय लोकसंख्या गणनेचे राजपत्र अधिसुचना काढण्यात आले आहे. ही लोकसंख्या गणनेची प्रक्रिया डिजीटल होणार आहे. 35 लाखापेक्षा जास्त कर्मचारी या डिजीटल प्रक्रियेसाठी कार्यरत असणार आहेत.
नवी दिल्ली : 2025-06-16
जातनिहाय जनगणना आणि सार्वत्रिक जनगणना यांच्यासंबधातील राजपत्रक अधिसूचना ( Caste Census Gazette Notification ) काढण्यात आले आहे. हि जनगणना प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार आहे. 35 लाखापेक्षा अधिक कर्मचारी या डिजिटल प्रक्रियेसाठी काम करणार आहेत. यासाठी एक मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे. ज्यात जनगणनेशी संबंधीत सर्व माहिती एकत्र केली जाणार आहे. हे मोबाईल ॲप एकुण 16 भाषांमध्ये काम करणार आहे.
जनगणना आणि जातीय जनगणना करण्यात यावी म्हणून, विरोधी पक्षाकडून बऱ्याच दिवसांपासून मागणी केली जात होती. देशात बऱ्याच वर्षांपासून जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आल्याने जनगणनेविषयीचे प्रलंबित काम आता पूर्ण होणार आहे. जनगणनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. सध्याचे युग हे डिजिटल आहे. म्हणून याचे कामही डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहे.
Table of Contents
1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार जनगणनेचे काम
जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सरकारकडून डिजिटली सुरू करण्यात येणार आहे. जनगणना प्रक्रिया 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या सर्व प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, सरकारला अपेक्षा आहे की, या जनगणनेचा प्राथमिक डेटा सुद्धा मार्च 2027 पर्यंत प्रसिद्ध केला जाईल. मात्र सर्व डेटा प्रसिद्ध करण्यासाठी डिसेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागणार आहे. सरकारी सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार लोकसभा आणि विधानसभेच्या जागांचे सिमांकनही 2028 पर्यंत केले जाऊ शकते.
पहिल्यांदाच होणार जनगणना आणि जातीय जनगणना एकत्र
गृहमंत्रालयाकडून सोमवारी जनगणना अधिनियम, 1948 नुसार जनगणना आणि जातीय जनगणना संबंधित अधिकारित गॅजेट अधिसूचना देण्यात आल्या आहेत. त्यासह त्यासंबंधीच्या सर्व संस्था सुद्धा कार्यान्वित झाल्या आहेत. जनगणनेसाठी कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, कामाचे स्वरुप ठरवणे आणि प्रत्यक्षठिकाणी जाऊन काम करणे , हे सर्व नियोजन करण्याचे काम सुरू आहे. पहिल्यांदाच जनगणना आणि जात जनगणना हे एकत्र होणार आहे.
2021 मध्ये जनगणना होऊ शकली नाही.
देशात प्रत्येकी 10 वर्षांनंतर जनगणना केली जाते. मात्र यावेळी 2011 नंतर थेट 2025 मध्ये जनगणनेचे काम होणार आहे. कारण 2021 मध्ये कोविड -19 ची साथ जगभर पसरल्याने , देशातही त्याच धोका वाढलेला होता. त्यामुळे तेव्हा जनगणना होई शकली नाही.
कशी होणार ही प्रक्रिया
जनगणनेसाठी सुमारे 35 लाख कर्मचारी एकावेळी डिजिटल पद्धतीने हे काम करणार आहेत. त्यासाठी एक मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे. 21 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्धीष्ट आहे. हि प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर दुसरा टप्पा मार्च 2027 मध्ये पूर्ण होणार आहे. एक मार्च 2027 च्या मध्य रात्रीपर्यंत जो डेटा या ॲपमध्ये नोंदवला जाईल, तीच जनसंख्या रेकॉर्डमध्ये नोंदली जाणार आहे.