सध्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सुरू झालेल्या युद्धाची अखेर समाप्ती करण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय : 2025-05-10
अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपासून हा निर्णय अंमलात आणण्यात येत आहे. याबाबतच्या घोषणेला दोम्ही देशाकडून संमची दर्शवण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. भारताने आपल्या अटीशर्ती लागू करून या युद्धविरामाला संमती दिली आहे.
युद्धविरामाचा निर्णय घेताना भारताने मोठी घोषणा केलेली आहे, भारत आतंकवाद्याच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान आज संध्याकाळपासून एकमेंकांवर गोळीबार करणार नाहीत, यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीओमोआला फोन आला होता. पुढील काळात म्हणजे 12 मे ला या दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत.
काय आहेत युद्धविरामाचे महत्त्वाचे मुद्दे –
- दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही.
- मिल्ट्री कारवाई होणार नाही.
- जमीन, हवा आणि सागरी अशा तिन्ही मार्गाने हल्ला करण्यात येणार नाहीत.
- आज संध्याकाळी 5 वाजतापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्रसंधी केली जात आहे.
- 12 मे ला परत एकदा पाकिस्तानशी चर्चा होणार.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ट्वीट करून या शस्रसंधीची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्ताने समझोता केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतातील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय हिंदू पर्यटकांवर क्रूर हल्ला केला होता. त्यात एकुण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आणि पाकला धडा शिकवला, त्यातूनच युद्धाला तोंड फुटले होते. मात्र आज या युद्धाची समाप्ती झाल्याचे घोषीत करण्यात आले आहे.