Translate :

Sponsored

Brad Arnold Passed Away, Sad News 2026 : रॉक स्टार Brad Arnold यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन , संगीत क्षेत्रावर शोककळा : 3 Doors Down Lead Singer Brad Arnold Passed Away At 47

रॉक स्टार Brad Arnold यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन , संगीत क्षेत्रावर शोककळा

Singer Brad Arnold Passed Away : ” 3 डोअर्स डाउन ” या प्रसिद्ध रॉक बँडचे  मुख्य गायक आणि आवाज असलेले ब्रॅड अर्नोल्ड यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते.

 अमेरिका  : 08-02-2026

रॉक संगीतातील एक नवीन ओळख देणारे प्रसिद्ध गायक ब्रॅड अर्नोल्ड  (Brad Arnold Passed Away) यांचे शनिवारी वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रसिद्ध गायनाने आणि अनोख्या आवाजाने अनेक चाहत्यांना भूरळ घातली होती. ग्रॅमी नामांकित बँड ” 3 डोअर्स डाउन ” चे प्रमुख खागय ब्रॅड अर्नोल्ड यांनी काही महिन्यांपूर्वी खुलासा केला की ते किडनी कॅन्सरशी झुंज देत आहेत. बँडने अधिकृत निवेदनाच त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली, ज्यामुळे संगीत उद्योगात शोककळा पसरली आहे.

बँडने एका निवेदनात म्हटले आहे की, ” कर्करोगाने शूर लढाईनंतर ब्रॅड अर्नोल्ड यांचे निधन झाले. त्यांच्या प्रियजनांनी वेढलेल्या शांततेत त्यांचे निधन झाले. ” 3 डोअर्स डाउनने 1995 मध्ये मिसिसिपीमध्ये आपला प्रवास सुरू केला, परंतु 1999 च्या त्यांच्या हिट गाण्याने, क्रिप्टोनाइटने त्यांना ओळख मिळाली.” गायक आता आपल्यात नसले, तरी त्यांचे स्थान चाहत्यांच्या मनात जिवंतच राहणार आहे.

वयाच्या 15 व्या वर्षी लिगिले होते पहिले गाणं  ( Brad Arnold Passed Away)

हे गाणं इतरे हिट झाले की, त्यामुळे बँडला ग्रॅमी नामांकन देखील मिळाले. मनोरंजक गोष्ट म्हणजे, ब्रॅडने वयाच्या 15 व्या वर्षी गणिताच्या वर्गात कागदाच्या तुकड्यावर हे गाणे लिहिले होते. त्यांच्या पहिल्या अल्बम ” द बेटर लाईफ” ने यशाचे सर्व विक्रम मोडले. सहा दशलक्षाहून अधिक हा अल्बम विकल्या गेल्या आहेत. त्यानंतर बँडला 2003 मध्ये त्यांच्या “व्हेन आय एम गॉन” गाण्यासाठी दुसरे ग्रॅमी नामांकन मिळाले, ज्याने रॉक संगीताच्या जगात त्यांचे स्थान कायमचे मजबूत केेले.

ब्रॅड अर्नोल्डने त्याच्या  गाण्यांनी चाहत्यांच्या ह्रदयाला स्पर्श केला. ब्रॅड अर्नोल्डच्या प्रभावाची आठवण करून देताना, बँडने म्हटले की त्यांनी रॉक संगीताला एक नवीन ओळख दिली. सामान्य माणसाला भावणाऱ्या साध्या, सरळ भाषेत ह्रदयस्पर्शी गीते लिहिणे ही त्यांची खासियत होती. संगीत प्रत्येक घरात पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

“बी लाईक दॅ” हे गाणे ” अमेरिकन पाई 2 ” चा भाग ( Brad Arnold Passed Away)

त्यांच्या शानदार कारकिर्दित, 3 डोअर्स डाउनने सहा स्टुडिओ अल्बम रिलिज केले, त्यापैकी शेवटचा 2016 चा ” अस अँड द नाईट” होता. त्यांची अनेक गाणी, जसे की ” लॉसर, ” डक अँड रन, आणि ” बी लाईक दॅट”, चार्टबस्टर ठरली. विशेषतः ” बी लाईक दॅट”, 2001 च्या प्रशंसित चित्रपट “अमेरिकन पाई 2 “च्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आला होता आणि आजही चाहत्यांमध्ये तो लोकप्रिय श्रोता आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored