Translate :

Sponsored

Boss Scam Warning, 2026 : सरकारचा जनतेला मोठा इशारा ! व्हॉटसॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; सावध रहाण्याचे आवाहन : Government Warns Against Boss Scam 14 C Issues Fresh Cyber Security Advisory

सरकारचा जनतेला मोठा इशारा ! व्हॉटसॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे.

Boss Scam Warning : सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी ‘Boss Scam’ नावाची नवी पद्धत वापरत असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. गृह मंत्रालयाच्या I4C ने नागरिकांसह अधिकारी आणि कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशयास्पद ई-मेल, व्हॉटसॲप संदेश आणि लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

दिल्ली : 28-06-2026 

सध्या देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगार CEO किंवा RBI अधिकारी (Boss Scam Warning) असल्याचे भासवून फसवणूक करत आहेत. सरकारने पुन्हा एकदा इशारा दिला आहे की , लोकांनी नव्या सायबर फ्रॉडबाबत सावध रहावे. सायबर गुन्हेगार आता लोकांची फसवणूक करण्यासाठी कोणत्या नवीन पद्धतीचा वापर करत आहेत, याबाबत गृह मंत्रालयाने सूचना जाहीर केल्या आहेत. यामुळे आता लोकांना सावध राहण्यास सांगितलं असून कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न Boss Scam Warning

सायबर गुन्हेगार आता सामान्य लोकांना नाही तर सरकारी विभागांमध्ये बसलेल्या मोठ्या अधिकाऱ्यांना लक्ष कऱण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्याती योजना आखत आहेत. लोकांना व्हॉटसॲप मेसेज किंवा एसएमएसद्वारे खोट्या लिंक पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बॉस स्किम Boss Scam Warning

गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्योरिटी विंग I4C ने बॉस स्किम असे नाव दिले आहे. I4C ने त्यांच्या एडवाइजरीमध्ये लोकांना सावधगिरीचा इशारा देत सांगितलं आहे की, खोटे ई-मेल, व्हॉटसॲप मेसेज इत्यादीपासून सावध रहा. सायबर गुन्हेगार आरबीआयचे अधिकारी किंवा कंपन्यांचे सिईओ असल्याचे भासवून ई-मेल किंवा खोटे मेसेज पाठवतात आणि लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

व्हॉटसॲप मेसेज, ईमेल किंवा एसएमएसद्वारे सुरू आहे स्कॅम Boss Scam Warning

राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषम युनिट (NCTAU) आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) यांनी बॉस स्कॅम नावाच्या या फसवणूकीच्या नवीन पद्धतीबद्दल शोध लावला आहे. यामध्ये गुन्हेगार उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर गुन्हेगार यांना व्हॉटसॲप मेसेज, ईमेल किंवा एसएमएसद्वारे खोट्या लिंक पाठवतात.

कारण उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांचा कोणताही डेटा लीक झाला तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे I4C ची चिंता देखील वाढली आहे. एसंजीने म्हटलं की, मालवेयरद्वारे एग्जिक्युटीव्हच्या विंडोज डिव्हाइस आणि ॲक्टिव्ह व्हॉटसॲप वेब सेशनचा वापर करून सायबर गुन्हेगार मोठे आर्थिक व्यवहार करू शकतात.

असा होत आहे स्कॅम  (Boss Scam Warning)

सर्वात आधी सायबर गुन्हेगार सिईओ किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यांना ई-मेलद किंवा व्हॉटसॲपद्वारे संपर्क करतात. सायबर सिआओ किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यांना आरबीआय किंवा इतर नियामक असल्याचे भासवून ईमेल पाठवतात. संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर सायबर गुन्हेगार फाईल्स पाठवून युजर्सच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवतात.

सायबर गुन्हेगारांचा मालवेअर तुमच्या फोनमध्ये एंटर होताच त्यांच्याकडे तुमच्या डिव्हाईसचा संपूर्ण ॲक्सेस जातो. केवळ थेट कॉल करून करा.  किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री करूनच व्यवहार करा.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored