Translate :

Sponsored

Big News Rupali Chakankar, Breaking 2026 : रुपाली चाकणकरांची गंच्छती होणार का ? खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश : CM Devendra Fadanavis Give Order To Give Resign In Ashok Kharat Case

Big News, Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची  पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. आता मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिल्याची माहीती आता समोर येत आहे.

मुंबई : 20-03-2026 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Big News Rupali Chakankar) यांचे अशोक खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तेव्हापासून राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणामुळे चाकणकरांवर सर्व स्तरातून टिका होत आहे. विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

अशोक खरातचे पाय गर्तेत  (Big News Rupali Chakankar)

नाशिक पोलिसांनी अशोक खरात प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. कॅप्टन खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांच शाखेच्या ताब्यात आहे. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल कऱण्यात आलेला आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिओचे स्क्रिनशॉर्टस पाठविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. नीरज जाधवने कॅप्टन खरातच्या केबीनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्यास संशय आहे. त्यामुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अशोक खरातच्या आणखी कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार (Big News Rupali Chakankar)

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मा.मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ.अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का ? याचाही तपास व्हायला हवा.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”mr” dir=”ltr”>मा. मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या…</p>&mdash; Rohit Pawar (@RRPSpeaks) <a href=”https://twitter.com/RRPSpeaks/status/2034997097578291619?ref_src=twsrc%5Etfw”>March 20, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे (Big News Rupali Chakankar)

नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ” या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्यावतीने कऱण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल. तसेच अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांनी देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored