Translate :

Sponsored

Bhushan Gawai becomes Chife justice : महाराष्ट्राचे भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश ; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

दिल्ली : 2025-05-14

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे न्यायाधीश भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपश घेतली आहे. ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत. या पदावर विराजमान होणारे ते दुसरे व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर, भूषण गवई यांनी पदभार घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गवई यांना या पदावर सात महिन्यांचा कालावधी व्यतित करता येणार आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती जगडीप धनखड यांच्यासह केंद्रातल्या प्रमुख नेत्यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करून विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई यांचा सहभाग होता.  तसेच 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते. 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी 

भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला झाला. ते 2003 पासून ते 2019 पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. भारतीय रिपब्लिकन पार्टी चे दिवंगत नेते ,माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु.गवई यांचे चे पुत्र आहेत. महाराष्ट्र  भूषण गवई हे अनुसूचित जाती प्रवर्गातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. ते महाराष्ट्रातील अमरावतीचे ते आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई हे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर अमरावतीकडे दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे. गवई यांनी सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, लाडू वाटप करत आनंद साजरा केला.  

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored