Translate :

Sponsored

Bhiwadi Chemical Factory Fire, Shocking News 2026 : केमिकल फॅक्टरीला भाषण आग, सात कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू : Rajasthan Bhiwadi Chemical Factory Fire Seven Workers Died

केमिकल फॅक्टरीला भाषण आग, सात कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू

Bhiwadi Chemical Factory Fire : भिवाडीच्या खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात भीषण आग लागून, सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊ याविषयी.

भिवाडी : 16-02-2026 

राजस्थानच्या औद्योगिक जिल्ह्यातील भिवाडी  (Bhiwadi Chemical Factory Fire ) येथे आज सकाळी भीषण आग लागली. खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की, तेथील कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या ह्रदयद्रावक अपघाताता सात कामगारांचा जागीच जळून मृत्यू झाला. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीत व्यक्त केली जात आहे.

काय घडले ? ( Bhiwadi Chemical Factory Fire)

सोमवारी सकाळी 9:30 च्या सुमारास काम जोरात सुरू असताना ही दुदैर्वी दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, भिवाडीच्या खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिय कारखान्यात सुमारे 25 कामगार उपस्थित होते. आग अचानक आणि वेगाने पसरली. त्यामुळे कामगारांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. एडीएम सुमिता मिश्रा यांनी सांगितले की, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना ही घटना समजली. तातडीने त्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले.

दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतरही सांगाड्यांचा ढिग शिल्लक ( Bhiwadi Chemical Factory Fire )

आगीची माहिती मिळताच, खुसखेडा आणि भिवाडी रिको अग्निशमन केंद्रातील अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. रसायनांचा साठा असल्यामुळे आगीच्या ज्वाळा अत्यंत भीषण होत्या आणि त्या आटोक्यात आणण्यासाठी सुमारे दीड तास कठोर परिश्रम करावे लागले. आग विझवल्यानंतर जेव्हा बचाव पथक कारखान्यात दाखल झाले तेव्हा अधिकारी समोरचे दृश्य पाहून थक्क झाले. कामगारांचे जळालेले सांगाडे त्यांच्यासमोर पडले होते. आगीची भीषणता इतकी होती की, मृतदेह ओळखता येत नव्हते.

सुरक्षा मानकांची तपासणी सुरू

प्रशासनाने आतापर्यंत 7 कामगारांचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे, तर 2 कामगार अजूनही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. ढीगाऱ्यात त्यांचा शोध सुरू आहे. तिजाराचे डीएसपी शिवराज सिंह घटनास्थळी उपस्थित आहेत आणि त्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. भिवाडीचे एसपी आणि एडीेएम देखील घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या कारखान्यात ज्वलनशील रसायने हाताळण्यासाठी आणि आग प्रतिबंधक सुरक्षा मानकांचे पालन केले गेले का याची प्रशासन चौकशी करत आहे.

राजस्थानच्या औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याने याआधीही मोठे अपघात झाले आहेत . भिवाडीच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक कामगारांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या संपू्रण परिसर या घटनेमुळे धक्क्यात आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored