Translate :

Sponsored

Baramati Malegaon Sugar factory Election Completed Total Vote 88 Percentage Result Will Be On 24 June : अजित पवार की चंद्रराव तावरे ? माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 88 टक्के मतदान .

Baramati Malegaon Sugar Factory Election : बारामती येथील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीसाठी 88 टक्के मतदान झाले आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. 

बारामती : 2025-06-22

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीला 88.5 टक्के मतदान झाले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे. मतदान पेट्या बारामतीमधील शासकीय भवन येथे जमा करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणपकीचा निकाल लागणार 24 जून लागणार आहे. त्याआधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

एकुण 88 मतदान झाले

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया संपली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 84.52 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 90 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीसाठी एकुण 88.50 टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावरून सर्व बॅलेटपेपर युनिट बारामती शहरातील प्रशासकीय भवनात नेण्यात आले आहेत. 

67 मतदान केंद्रावर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार विरूद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना झाल्याचे पहायला मिळाले. जवळपास 67 मतदान केंद्रावर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुक अजित पवार  चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

अजित पवार काय म्हणाले ?

या निवडणुकीतदरम्यान बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. येथे अजित पवार आणि चंद्रराव तावरे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत होते. एवढं वय झालं तरी अजूनही तावरे निवडणूक लढवतच आहेत. हे थांबलं पाहिजे, अशी टिका अजित पवार यांनी केली होती. तर मी 100 वर्षे जगणार आहे. मी शेवटपर्यंत निवडणूक लढवणार, असे तावरे यांनी म्हटले होते. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored