Bachchu Kadu : बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र : 2025-06-08
माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्र उपसलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. मोझरी येते ते या आंदोलनाला बसले आहेत. सध्या, लोकांच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम द्वेष पेरला जात आहे. मात्र मी बलिदान द्यायला तयार आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत., अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू
अन्नत्याग आंदोलनाला बसलेले असताना बच्चू कडू यांनी भाषण केले. यावेळी बोलताना देशातील शेतकरी नेते राकेश टिकेत उद्या येथे येणार आहेत. देशात आता जातीय रंग देण्याचं काम केलं जातयं. राज्यात मराठा आणि ओबीसी वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे, अशी टिकाही त्यांनी केली. आमच्या डोक्यात हिंदू-मुस्लिम द्वेष टाकला जात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे, ही व्यवस्था मोडून काढायची आहे. आमच्या बियाणांचे भाव का कमी झाले नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही
सरकारने मत विकायला लाडकी बहीण सुरू केली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता. सरकारला माहीत आहे की, बच्चू कडू मेला तरी फरक पडत नाही. कारण त्यांनी जाकी धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
कडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
आजपासून, बच्चू कडू यांचे अमरावतीच्या गुरूकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू झाले आहे. शेतकरी, अपंग, शिक्षक, दिव्यांग,शेतमजूर, मच्छिमार यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.