Ayushman Bharat Schem : आयुष्मान भारत या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आले आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे.
दिल्ली : 23/11/2025
भारतात खाजगी आरोग्य वैद्यकीय उपचाराचा खर्च खुप महाग होत आहे. अशा परिस्थीतीत आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळत होता. मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे.
आयुष्मान भारत योजनेविषयी ( Ayushman Bharat Schem )
आयुष्मान भारत (Ayushman Bharat Schem) ही मोदी सरकारची आरोग्य विमान योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रूग्णलयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसमान्यांना मोठा फायदा होत आहे.
कोणत्या सदस्यांना कव्हर मिळते ? (Ayushman Bharat Schem)
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके),पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत रहणाऱ्या इतर सदस्यांचा उपचारासाठी 5 लाख कव्हर मिळते. सरकारने या योजनेत एक बदल केला आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. जर एखादे कुटुंबाने या योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल आणि त्या घरात एखाद्या सदस्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना अतिरिक्त 5 रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. अशाप्रकारे या कुटुंबाला 10 लाखांचे कव्हर मिळेल.
10 लाखांचे कव्हर कसे मिळवायचे ? (Ayushman Bharat Schem)
10 लाखांचे कव्हर मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. संबंधित वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करावे लागेल. यासाठी पात्र व्यक्तींना आधार ईकेवायसी पुन्हा करावी लागेल. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नाही. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला देखील पूर्ण फायदे मिळतात. मोठी शस्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा उपचारासाठी हे कव्हर मिळते.