Translate :

Sponsored

Ashok Kharat Case, Shocking News 2026 : ज्योतिषी अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड, छापेमारीत अनेक गुपितं उघड : AShok Kharat Case Revolver And Cartridge Found In Farm House

ज्योतिषी अशोक खरातचा धक्कादायक कारनामा उघड, छापेमारीत अनेक गुपितं उघड.

Ashok Kharat Case : स्वयंघोषित अंकशास्रज्ञ अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप कऱण्यात आले आहेत. त्यानंतर त्याच्याकडील पेनड्रोयव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले होते. आता त्याच्या घरातून धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

नाशिक  : 19-03-2026 

महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली (Ashok Kharat Case) अटक असलेला स्वयंघोषित अंकशास्र्ज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला कॅप्टन अशोक खरात याच्याबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप कऱण्यात आले आहेत. त्यानंतर त्याच्याकडील पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले आहेत. त्याच्यावर अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

अशोक खरातच्या फार्महाऊसवर छापा (Ashok Kharat Case)

बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने रात्री उशीरा छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती शस्रसाठा आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली (Ashok Kharat Case)

मिरगाव येथील फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तुल आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहे. ती पोलीसांनी जप्त केली आहे. या कारवाईमुळे अशोक खरातचे धाबे दणाणले असून, तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरातील पिस्तूल आणि काडतूसे कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कोट्यावधींची संपत्ती (Ashok Kharat Case)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. नाशिक शहरात त्याचा अलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. एकुणच जवळपास 200 कोटी रुपयांची संपत्ती त्याने उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored