Translate :

Sponsored

Ashish Shelar Decision Immersion Of Big Ganesh Idols June 30 : सार्वजनिक गणेशोत्सव संपवण्याचे षडयंत्र ! आशिष शेलार यांचा विरोधीपक्षावर आरोप.

Ashish Shelar Decision Immersion Of Big Ganesh Idols June 30 : न्यायालयाने पीओपी च्या गणेश मूर्तींवरील बंदी हटवली आहे. या विषयावर आशिष शेलार यांनी मोठे विधान करत, विरोधी पक्षावर षडयंत्र रचन्याचा आरोप केला आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी याबाबत 30 जूनपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

मुंबई : 2025-06-16

न्यायालयाकडून पिओपी मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार ( Ashish Shelar )यांनी आश्वासन दिले आहे की, आता मोठ्या गणेश मूर्तींच्या ( Big Ganesh Idols )समुद्र विसर्जनाबाबतची आपली स्थिती  सरकार 30 जूनपर्यंत न्यायालयात प्रस्तुत करणार आहे. परळमधील शिरोडकर सभागृहामध्ये अखिल सार्वजनिक गणेशोस्तव महासंघ, महाराष्ट्र राज्य श्री गणेश मूर्तीकार कामगार संघटना, अखिल सार्वजनिक उत्सव समिती, सार्वजनिक उत्सव समिती, मुंबईद्वारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि गणेश भक्तांचे एक भव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 

या संमेलनाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शेलार यांनी केले होते. यावेळी आमदार कालिदास कोलंबकर, संजय उपाध्याय, माजी आमदार मधु चव्हाण, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगांवकर, कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर, प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

शहरी नक्षलवादाचा अजेंडा

गेल्या काही वर्षांपासून हिंदु धर्माचे प्रतिक असणारा सार्वजनिक गणेशोत्सवाला संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आरोप केला आहे की, हे षडयंत्र कॉंग्रेस, एनसीपी (एसपी) आणि शिवसेना (ठाकरे गट ) यांच्याद्वारे हे षडयंत्र रचले जात आहे. ज्याला शेलार यांनी शहरी नक्षलवाद म्हटले आहे. हा वाद 2003 मध्ये सुरू झाला होता. जेव्हा एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात नैसर्गिक जलस्रोतावरील हिंदू धर्मातील पूजाअर्चांचा होणारा परिणाम थांबवण्याची मागणी केली होती. तत्कालिन सरकारने या याचिकेचा विरोध केला नव्हता. ज्यामुळे हा मुद्दा बराच विवादात्मक बनला. राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने त्यासाठी काही निर्देश दिले होते. या निर्देशांचाही विरोध करण्यात आला. नंतर हे प्रकरण राष्ट्रिय हरित लवादाकडे गेले. तिथेही ही

याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने 2020 मध्ये काही निर्देश दिले, ज्यामुळे तत्कालिन सरकारने आणि विशेषतः मुंबई महापालिकेने पिओपी मूर्तींवर बंदी आणली. 

षडयंत्राचा आरोप

आदित्य ठाकरे यांनी 2018 मध्ये मुंबई महापालिका बजेट मध्ये पीओपी वर बंदी आणली आणि शाडू मातीला प्रोत्साहन दिले. ॲडव्होकेट शेलार यांनी याला शहरी नक्षलवाद म्हटले आहे. ते म्हणाले , आदित्या ठाकरे यांची ही हिंदूत्व विरोधी कृती आहे. या सर्व कृत्यांच्या मागे सुमारे 600 करोड रुपयांच्या मूर्ती व्यवसाय आणि पूजा सामान  आणि अन्य वस्तूंसह सुमारे 25,000 करोड रूपयांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा व्यापार बंद करण्याचे हे षडयंत्र आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही लढाई आर्धी जिंकली आहे, आता मोठ्या गणेश मूर्तीविषयीचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याविषयीचा निर्णयसुद्धा सरकार 30 जूनपर्यंत घेईल. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored