Translate :

Sponsored

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी का साजरी करतात ? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी : Why We Celebrate the Ahshadhi Ekadashi ? Know The All Information About Ashadhi Ekadashi.

Ahshadhi Ekadashi 2025 : देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी यावर्षी उद्या म्हणजे 6 जुलै 2025 यादिवशी आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलेला आहे. वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीचे खुप महत्त्व आहे. का इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आषाढी एकादशी साजरी करतात ? जे आपण जाणून घेऊ. 

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. या संतांचे मुख्यत्वेकरून दैवत आहे ते विठ्ठल. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीत हे संत आयुष्यभर रमलेले होते. जात-धर्म यांच्यापलिकडे जाऊन संतांनी आपल्याला भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. संतांच्या परंपरेने महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरच्या वारीची देण दिली. आणि या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची असते ती एकादशी. वर्षभरात एकुण साधारण 24 एकादशी असतात. हिंदू लीप वर्षात दोन अतिरिक्त एकादशी येतात. त्यामुळे साधारण एका वर्षात एकादशींची संख्या 26 होते. या सर्व 26 एकादशींमध्ये आषाढी एकादशीला सर्वात जास्त महत्त्व आहे. वर्षभर काहीजण या सर्व एकादशीचा उपवास करतात. मात्र महाराष्ट्रात जे नेहमीच्या एकादशी उपवास करत नाही, ते भक्तगणही आषाढी एकादशीचा उपवास करतात. इतके याचे महत्त्व आहे. जेव्हा आधी आपण एकादशी म्हणजे काय हे जाणून घेऊ. 

एकादशी म्हणजे काय ? 

एकादशी हा एक महत्त्वाचा हिंदू धर्मात करण्यात येणारा उपवास आहे. पंचागनुसार जो प्रत्येक चंद्र महिन्याच्या (वद्य आणि शुक्ल ) अकराव्या दिवशी येतो. एका वर्षात 12 महिने असतात. आणि प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक वद्य पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात, अशा प्रकारे एका वर्षात एकुण 24 एकादशी येतात. अपवाद फक्त लीप वर्षाचा. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षात अधिक मास येतो, ते वर्ष. 

प्रत्येक एकादशीची वेळ चंद्राच्या स्थितीनुसार असते. हिंदू कॅलेंडरनुसार पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतची चंद्राची प्रगती 12 अंशाच्या पंधरा समान चापांमध्ये विभागली जाते. प्रत्येक चाप एक चंद्र दिवस मोजतो. ज्याला तिथी असे म्हणतात. चंद्राला विशिष्ट अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ त्या चंद्र दिवसाची लांबी असतो. एकादशी म्हणजे 11 वी तिथी किंवा चंद्र दिवस. अकरावी तिथी ही वाढत्या आणि अस्त  होणाऱ्या चंद्राच्या अचूक कोन आणि टप्प्याशी संबंधित असते. चंद्र महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या भागात, एकादशीच्या सुरूवातीला चंद्र 3/4 पूर्ण असेल आणि चंद्र महिन्याच्या अर्ध्या भागात , एकादशीच्या चंद्र 3/4 गडद असतो. त्यावरून हिंदू कॅलेंडरमध्ये एकादशी नोंदवली जाते. 

आषाढी एकादशी का साजरी करतात ?

आषाढी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्याचे एक कारण या आषाढ महिन्यात पंढरपूरच्या वारीचा काळ येतो. विठ्ठल आणि विष्णू हे एकच आहेत. त्यांच्या भक्तीचा मार्ग म्हणजे ही आषाढी एकादशी होये. आषाढी एकादशीला देवशयनी एकादसी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो. त्यामुळे त्याचेही एक वेगले धार्मिक महत्त्व आहे. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. भागवत संप्रदायासाठी हा दिवस विशेष मानला जातो. आषाढी एकादशी पर्यंत वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दारात पोहोचतात. म्हणून या दिवसाला एका वेगळ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

आषाढी एकादशी 2025 तारीख

यावर्षी 6 जुलै 2025 यादिवशी आषाढी एकादशी आहे. 

आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व

आषाढी एकादशीला उपवास करून, विष्णूची भक्ती केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा करतात. जीवनात सूख, समाधान मिळते असे मानले जाते. या एकादशी नंतर संपूर्ण चार महिने देव योग निद्रेत जातात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ असेही म्हणतात. असे मानले जाते की, विश्वाचा पसारा सांभाळणाऱ्या भागवान विष्णूंचा हा निद्रेचा काळ असतो. याकाळात भगवान शिव ब्रम्हांड चालवण्याची जबाबदारी घेतात, म्हणून चातुर्मासात भगवान शिवाची पूजा करणे फलदायी मानले जाते. 

आषाढी एकादशी हा अध्यात्म आणि योग यांचा मिलाफ आहे. वर्षभरात एकादशीचा उपवास करणे हे आरोग्यासाठीही फलदायी असल्याचे आता विज्ञानही मानत आहे. मात्र ज्यांना वर्षभर एकादशीचे व्रत करण्यास जमत नाही, ते आषाढी एकादशीच्या उपवासाला विशेष प्राधान्य देतात, त्याला कदाचित या वारीच्या अध्यात्मिक वातावरणाचाही हातभार असेल. महाराष्ट्रातील घराघरात आषाढी एकादशी या दिवसाला एखाद्या सणापेक्षा कमी महत्त्व नाही. सर्वजण भक्तिभावाने आणि आनंदाने हे व्रत करताना आढळतात. या उपवासाला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored