Translate :

Sponsored

Asha Bhosle Biography, 2026 Great Story : एका वादळी आयुष्याची अखेर ! 2 वेळा लग्न, मुलांचा सांभाळ ते अविस्मरणीय संगीत प्रवास : Asha Bhosle Biography Everything To Know About Her Life

एका वादळी आयुष्याची अखेर ! 2 वेळा लग्न, मुलांचा सांभाळ ते अविस्मरणीय संगीत प्रवास .

 Asha Bhosle Biography : आशा भोसले हे नाव देश-परदेशात प्रसिद्ध असणारे नाव. आशा भोसले यांच्या आयुष्याविषयी सर्व माहिती केवळ एका क्लिकवर. बॉलीवूडचा आवाज हरपला.

मुंबई : 12-04-2026

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आशा भोसले (Asha Bhosle Biography) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात 11 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. पण नंतर त्यांची नात जनाईने सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा केला की, छातीत संसर्ग आणि प्रचंड थकवा आल्यामुळे आजी भोसले यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना करण्यास सुरूवात केली.

मात्र, आज आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. अगदी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी मंचावर थेट गाणे गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आपल्या कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी गायलेल्या आशा भोसले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिल्या. त्यांचे आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हते. त्यांनी केलेली दोन लग्ने, त्यांच्या मुलीने केलेली आत्महत्या, संगीतसाम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर या आपल्या ज्येष्ठ भगिनीसोबत असणारे त्यांचे संबंध अशा अनेक कारणांमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय होत्या.

त्यांनी आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड देत आपले आयुष्य सावरले आणि इतके उत्तुंग यश संपादित केले होते.

कधी जन्म झाला ? (Asha Bhosle Biography)

गानसाम्राज्ञी आशा भोसले यांचा जन्म 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या मात्र, त्या 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची मोठी बहिण आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी सर्व कुटुंबाच्या उदरनिर्वागाचा भार उचलला. पुढे दोन्ही बहिणींनी गाण्यास सुरूवात केली आणि कुटुंबाला सावरले.

वयाच्या 16 वर्षी चढल्या बोहल्यावर (Asha Bhosle Biography)

आशा भोसले यांची कारकिर्द आणि कर्तुत्व उत्तूंग आहे. मात्र वैयक्तिक आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरलेले आहे.  आशा भोसले यांनी वयाच्या 16 वर्षी घरच्यांच्या विरोधात जाऊन आणि लपून आपले सचिव गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. आशा भोसले यांचे कुटुंब आणि बहिण लता मंगेशकर यांनी या नात्याला कधीही मान्यता दिली नाही. कारण त्यावेळी त्या फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि गणतपतराव तेव्हा 31 वर्षांचे होते. मात्र, आशा भोसले आपले निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्यांनी गणपतराव यांच्याशी विवाह केला. मात्र त्यांचे हे नाते जास्त काळ चालले नाही. 11 वर्षाच्या संसारानंतर ते संपुष्टात आले.

सासरकडून छळ (Asha Bhosle Biography)

आशा भोसले यांना सासरच्या मंडळींनी बरेच छळले होते. त्यांना कठोर वागणूक आणि शारिरिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. त्यांनी त्यानंतर घर सोडले. आशा भोसले यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून खूप वाईट वागणूक मिळाली. त्यांना मारहाण केली गेली आणि घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले. कंटाळून, आशा भोसले आपल्या मुलांना सोबत घेऊन सासरच्या मंडळींना आणि पतीला सोडून वेगळ्या झाल्या. एकीकडे या लग्नामुळे कुटुंबिय दुरावले होते, दुसरीकडे संसारही मोडला होता. अशा परिस्थितीत त्या खचून गेल्या मात्र नंतर त्यांनी आयुष्यात मेहनत करत, आपले अस्तित्व निर्माण केले.

आर.डी.बर्मन यांच्याशी दुसरा विवाह (Asha Bhosle Biography)

आशा भोसले यांचे आर.डी.बर्मन यांच्याशी दुसरा विवाह झाला होता. पहिल्या लग्नाच्या अनुभवानंतर, आशा भोसले वयाच्या 47 व्या वर्षापर्यंत अविवाहित होत्या जवळपास 20 वर्षांनंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांचे दुसरे लग्न प्रसिद्ध संगीतकार आर.डी.बर्मन यांच्याशी झाले. पंचम दा म्हणून त्यांची ख्याती होती. ते आशा भोसले यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते. हे केवळ आशा भोसले यांचेच दुसरे लग्न नव्हते तर आर.डी.बर्मन यांचेही दुसरे लग्न होते. आर.डी.बर्मन यांच्याशी लग्न झाल्यावर आशा भोसले खऱ्याअर्थाने आनंदी होत्या. मात्र पंचमदा यांचा सहवासही त्यांना फक्त 14 वर्षेच लाभला. पंचमदा यांचेही निधन झाले आणि त्या पुन्हा एकट्या झाल्या.

आर.डी बर्मन यांच्या आईचा होता विरोध (Asha Bhosle Biography)

आशा भोसले या पंचमदा यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या आणि घटस्फोटित, तीन मुलांची आई होत्या. यामुळे पंचमदांच्या आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आर.डी बर्मन यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईची तब्येतही खालावली. त्यानंतर त्यांनी आशा बाईंशी विवाह केला. पंचमदा यांचाही हा दुसरा विवाह होता.

आशा भोसले यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार (Asha Bhosle Biography)

आशा भोसले यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये दोनदा नोंद झाली आहे.

ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या आशा भोसले या पहिल्या भारतीय गायिका आहेत.

2000 वर्षी आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored