Translate :

Sponsored

Arun kaka Jagtap : माजी आमदार अरूणकाका जगताप यांचे निधन, अहिल्यानगरवर (Ahilyanagar) शोककळा.

अहिल्यानगर : 2025-05-02

माजी आमदार अरूण  (Arunkaka Jagtap )(काका )जगताप यांचे आज (2 मे) ला पहाटे निधन झाले. अहिल्यानगरचे (Ahilyanagar) ते लोकप्रीय नेेते होते. समस्त अहिल्यानगरवासी त्यांना अरूण काका नावानेच ओळखत असत. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप हे त्यांचे पुत्र होत. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुणे येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

अरूण जगताप यांनी त्यांच्या संपूर्ण राजकिय कारकिर्दीत अनेक पदांवर काम केले. त्यांच्या राजकिय कारकिर्दिची सुरुवात क्रॉंग्रेस पक्षातून झाली. युवक कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद , अहिल्यानगर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवूण त्यांच्या राजकिय कारकिर्दिचा आलेख उंचावत गेला. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी, क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य, गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भुषवली. ते दोन वेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी विधानसभेसाठी देखील आपले नशीब आजमावले होते, मात्र दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही. 

पवारांचे विश्वासू सहकारी, कला, क्रिडा क्षेत्रावरील विशेष प्रेम 

अरूण काका यांची ओळख सुरुवातीला शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशीच होती, मात्र नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हयातील महत्त्वाचे नेत अशी ओळख त्यांनी मिळवली. जगताप यांचे क्रिडा आणि कला क्षेत्रावक विशेष प्रेम होते. क्रिकेट आणि कुस्ती या क्रिडा प्रकारात त्यांना विशेष रस होता. कला आणि क्रिडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी त्यांनी अहिल्यानगरमधील अनेकांना सहाय्य केले होते. समस्त अहिल्या नगरवासियांचेच ते काका होते. 

उपचारादरम्यान निधन 

अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांना ५ एप्रिलला पुणे येथिल खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासाठी नगरमधील सर्वधर्मातील नागरिकांकडून प्रार्थना केली जात होती. परंतु शुक्रवारी पहाचे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे पार्थिव त्यांच्या भवानीनगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शहरातील अमरधाम येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored