Translate :

Sponsored

Big Announcment ,Ladaki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो असे करा E-KYC अपडेट, कोणाचे लागणार आधारकार्ड ? जाणून घ्या : How To Update E-KYC For Ladaki Bahin Yojana.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी करावी लागणार अपडेट.

Ladaki Bahin Yojana E-KYC Update : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेत नवनवीन अपडेट समोर येत आहे. राज्यात सुमारे 2 कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी E-KYC अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची हे जाणून घेऊ.

मुंबई : 01/10/2025

गेल्यावर्षी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladaki Bahin Yojana E-KYC ) सुरू केली होती. या योजनेचा हेतू राज्यातील गरीब, गरजू महिलांना आर्थिक मदत मिळावी हा होता. मात्र कालांतराने या योजनेचा लाभ अनेक सुखवस्तू घरातील महिला घेत असल्याचे दिसून आले. त्यावर उपाय म्हणून शासनाने या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये सुधारणा करत, काही अटी लागू केल्या आहेत.

ज्यामुळे योजनेत होणार गैरव्यवहार थांबवता येईल. त्यातील एक मोठा बदल म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता E-KYC करावी लागणार आहे. या योजनेत ई-केवायसी अनिवार्य असून पतीचे किंवा पित्याचे आधारकार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आह. शासनाने ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही E-KYC प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. ही प्रक्रिया कशी करायची हे जाणून घेऊ. राज्याची ही लोकप्रीय योजना आहे.

ई-केवायसीसाठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे (Ladaki Bahin Yojana E-KYC)

ई-केवायसीसाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती हे सर्व कागदपत्र आवश्यक आहेत.

प्रक्रिया अशा करा पूर्ण  (Ladaki Bahin Yojana E-KYC)

या योजनेसाठी शासनाने वेगळे संकेतस्थळ सुरू केले आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याशिवाय ई-महासेवा केंद्रावर जाऊन महिलांना ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. या साईटवर जा. नाव, पत्ता, रेशन क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा मागितलेली कागदपत्रं यावर अपलोड करा. अपलोड पूर्ण झाल्यावर सबमीट बटण दाबा. कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored