Anmol Bishnoi Arrest : अनमोलवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकऱणातही अनमोलचे नाव समोर आले. आता त्याला अटक कऱण्यात आली आहे.
दिल्ली : 19/11/2025
कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला ( Anmol Bishnoi Arrest ) आज (19 नोव्हेंबर) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. त्याच्यावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येचा आरोप अनमोलवर आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि आज दिल्ली विमानतळावर पोहोचला, जिथे त्याला एनआयएने अटक केली. त्याच विमानाने इतर हद्दपार झालेल्यांनाही भारतात आणण्यात आले.
अमेरिकेत राहणारा अनमोल बिश्नोई 2022 पासून फरार होता. त्याचा तुरूंगात असलेला भाऊ लॉरेन्स बिश्नोई चालवत असलेल्या दहशतवादी सिंडिकेटमधील तो 19 वा आरोपी आहे. मार्च 2023 मध्ये एनआयने त्याच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. एनआयएच्या तपासानुसार 2020 ते 2023 दरम्यान अनेक दहशतवादी सिंडिकेटमधील तो 19 वा आरोपी आहे. मार्च 2023 मध्ये एनआयने त्याच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले.
एनआयएच्या तपासानुसार 2020 ते 2023 दरम्यान अनेक दहशतवादी घटना घडवून आणण्यात अनमोलने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना थेट मदत केली. तो नियोजनात सहभागी होता आणि भारतातील विविध घटनांच्या कटात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
अनमोलने अमेरिकेतून बिश्नोई टोळीचे नेटवर्क व्यवस्थापित केले. त्याने टोळीच्या शूटर्स आणि ग्राऊंड ऑपरेटीव्हना निर्देशित केले आणि त्यांना आश्रय आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला. तपासात असेही उघड झाले की अनमोलने परदेशातून भारतात पैसे उकळले. हे कऱण्यासाठी त्याने इतर गुंडांची मदत घेतली आणि टोळीच्या कारवाया चालवल्या.
कोण आहे अनमोल बिश्नोई ? ( Anmol Bishnoi Arrest )
प्रथम अनमोल बिश्नोई हे नाव समोर आले ते पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या 2022 च्या हत्या प्रकरणात. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की त्यांना अनमोलला भारतात पाठलले जात असल्याची माहिती देणारा ई-मेल मिळाला आहे. झिशान म्हणाले की, अनमोलला भारतात आणून त्याच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा द्यावी.
मुंबई पोलिसांचे प्रस्ताव ( Anmol Bishnoi Arrest )
अनमोलला प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी दोन प्रस्ताव पाठवले होते आणि देशभरात त्याच्याविरूद्ध अनेक खटले दाखल आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला, एजन्सींना माहिती मिळाली की अमेरिका आणि कॅनडामध्ये वारंवार आपले स्थान बदलणारा अनमोल कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्याकडून बनावट कागदपत्रांवर बनवलेला रशियन पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याला अमेरिकेतही ताब्यात घेण्यात आले होते. एनआयएने त्याच्या डोक्यावर 10 लाख रूपयांचे बक्षीस ठेवले होते.
अनेक प्रकरणांमध्ये तपास प्रलंबित ( Anmol Bishnoi Arrest )
अनमोल बिश्नोई अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जात आहे. पुढील कोणत्या एजन्सीला त्याची कोठडी द्यायची हे केंद्र सरकार ठरवले. महाराष्ट्र पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोल वॉंटेड आहे. मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आहेत.