Translate :

Sponsored

America Rejects Indian Mangoes : अमेरिकेने भारताचे 4 कोटींचे आंबे नाकारले ; सुरक्षेस्तव नष्ट करण्याचा निर्णय.

America Rejects Indian Mangoes :  गेल्या 10 वर्षांमधील आंबे निर्यातीत भारताला पहिल्यांदा इतका मोठा फटका बसला आहे. अमेरिकेने भारताचे सुमारे 4 करोड किंमतीचे आंबे नष्ट केले आहेत. 

नवी दिल्ली : 2025-05-20

भारतीय आंब्यांना जगभरातून मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षात ही मागणी वाढली आहे. मात्र असे असताना, भारतातून निर्यात करण्यात आलेले सुमारे 4 करोड रुपयांचे आंबे अमेरिकेने त्यांच्या मानांकनात पास न झाल्याने बाद केले आहेत. आंबे निर्यातीच्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आंबे नष्ट करण्याचे आदेश दिले असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांमुळे तब्बल  4 करोडचे आंबे अमेरिकेत नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातून पाठवण्यात आलेले आंबे, विमानतळावरच थांबवण्यात आले होते. 

(America Rejects Indian Mangoes ) अमेरिकेने हे आंबे विकिरण प्रक्रियेशी संबंधित कारणाने नाकारल्याचे कारण समोर आले आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच अशी वेळ आल्याचे समजते. पणन मंडळाकडून यासंबधीची सर्व चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेने भारतातून पाठवलेल्या आंब्याच्या 15 फेऱ्या परत करण्याचा निर्णय घेतला, त्यातील काही परत पाठवले आहेत. तर काही आंबे तिथेच नष्ट करण्यात आले आहेत. अमेरिकेतील लॉस एंजेलिस, फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

8 आणि 9 मे ला युएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर (USDA) या विभागाकडून आंब्यांवर प्रक्रिया केल्यानंतर  PPQ203 फॉर्म देण्यात आले होते. मात्र आंबे अमेरिकेत पोहोचल्यावर तेथिल अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून आंबे स्विकारण्यास नकार दिलेला आहे. म्हणजेत आंब्यामधील किटकांच्या उपस्थितीवरून नाही, तर कागदपत्रांमधील त्रुटींमुळे आंबे नाकारण्यात आले आहेत.  

अमेरिकेत फळे निर्यात करण्यासंबंधीची प्रक्रिया 

अमेरिकेत फळे आयात करण्यासाठी विकिरण प्रक्रिया अनिवार्य आहे. या प्रक्रियेत फळांंमधील जंतू मारले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फळं निर्यातदाराला किटक नियंत्रण प्रमाणपत्र ( PPQ203 ) फॉर्म देण्यात येतो भारतात, ही प्रक्रिया नवी मुंबई येथे केली जाते. युएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर (USDA) या विभागाच्या देखरेखीखाली हे काम चालते. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored