Translate :

Sponsored

Ajit pawar Faces challanges Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखाना निवडणूक, अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखाना निवडणुक आज पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरणारी आहे. 

महाराष्ट्र : 2025-06-22

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज पार पडत आहे. त्यासाठी मतदान सुरू झाले आहे. अत्यंंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जाते. यात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार आहेत. अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल, तर पवारांचा बळीराजा पॅनलया निवडणुकीत आहे. त्यांच्या विरोधात 85 वर्षांच्या चंद्रराव तावरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल हे या निवडणुकीत आहे. तसेच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनलसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. चंद्रराव तावरे हे कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. या निवडणुकीसाठी अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीत ठाण मांडून बसलेले आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored