पुणे : 2025-05-01
गुरूवारी पुण्यातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार वेळे आधीच पोहोचले. ठरलेल्या वेळेपूर्वीच त्यांनी उद्धाटन केल्यामुळे भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या, त्यांनी तशी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दिवसभर शहरातील राजकिय वर्तुळात याचीच चर्चा रंगल्याचे दिसले.
सकाळी सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम सुरू करण्याची सवय अजित दादांना आहे. त्यानुसारच त्यांनी आजच्या दिवसाची वाट सुरुवात केली. गुरूवारी कार्यक्रम ठरलेल्या वेळेपूर्वीच सुरू करून त्यांनी त्याचे उद्घाटन केल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमाचे आमंत्रण भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना होते. मात्र त्यांची वाट न पहाता हा उद्धाटनाचा कार्यक्रम उरकण्यात आला. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ही नारीजी व्यक्त करताना त्याम्हणाल्या, आम्हालाही पहाटे लवकर उठायची सवय आहे. पण नियोजित वेळेआधी उद्घाटन होवू नये. ही दादांना विनंती, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
अजित पवार यांनी सकाळी साडे सहाला असणाऱ्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला त्याआधीच हजेरी लावत, उद्घाटन करून घेतले होते. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केल्यावर, त्यांनी त्यांची माफी मागत परत एकदा उद्धाटन केल्याचे पहायला मिळाले.
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या ?
अजित पवार यांच्या कामाची पद्धत मला आवडते. आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे. मात्र, नियोजित वेळेआधी उद्धाटन होवू नये, हि दादांना विनंती आहे. मी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. मात्र त्या आधीच उद्धाटन झाले होते. दहा मिनिटे आधी उद्धाटन झाले होते, अशी नाराजी मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
माझी दादांनी विनंती आहे, की त्यांनी रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही एक वेळ द्या. प्रोटोकॉलनुसार ज्यांना, ज्यांना आमंत्रण आहे, ते सर्व येणार असतात. त्यामुळे वेळेआधीच उद्धाटन करू नये. आपण कधी रेल्वे, बस, फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर जातो. परंतु वेळेपूर्वीच ते निघून गेल्यावर वाईट वाटते. तसा हा प्रकार आहे. पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मी नक्की काम करेल.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्धाटन पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्धाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे उद्धाटन झाले.