Translate :

Sponsored

Aishwarya Rai’s Cannes 2005 Looks Viral : ऐश्वर्या राय चा कान्स महोत्सवातील पेहेराव ठरतोय हटके !

दरवर्षी प्रमाणे यंदासुद्धा भारताचे प्रतिनिधीत्व करताना विश्वसुंदरी ऐश्वर्या राय  (Aishwarya Rai )हिने कान्स चित्रपट महोत्सव 2025 (Cannes Film Festivel 2025 ) मध्ये आपल्या पेहेराव आणि अदांमुळे सर्वांना भूरळ घातली आहे. इतक्या वर्षात अनेकवेळा कान्सच्या रेड कार्पेरटवरून ऐश्वर्याने आपला जलवा दाखवला आहे, मात्र तीची क्रेझ कमी झालेली नाही ते तिने दाखवून दिले आहे. 

फ्रान्स : 2025-05-23

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festivel 2025 ) हे समिकरण कायमच हिट राहिलेले आहे. गेली तब्बल 23 वर्ष ऐश्वर्या राय आपल्या फॅशन सेन्स, अदा आणि पेहेरावाने प्रेक्षकांची मने जिंकत आलेली आहे. यावर्षीही तिने तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या दिवशी तिने मोतीया रंगाची सुंदर साडी आणि सिंदूर अशा पेहेरावात रेड कार्पेटवरून चालत सर्व भारतीयांसह जगभरातील तिच्या चाहत्यांचे मन जिंकले. 

यावर्षी ऐश्वर्याने भारतीय संस्कृती, पेहेराव यांची सुंदर झलक दाखवण्याचे जणू ठरवले असल्याचे, तिच्या पेहेरावांच्या निवडीवरून समजते आहे. साडीच्या लुकनंतर ऐश्वर्या 22 मे ला तिने काळ्या रंगाचा शिमरचा गाऊन घातला होता. हा पेहेराव वेस्टर्न स्टाईलचा असला तरी, त्यावर परिधान करण्यात आलेली ब्रोकेड कॅप जी तीने घातली होती, त्यावर श्रीमद्भभगवत गितेतील श्लोक लिहिलेला होता. त्यातून तिने भारतीयांसाठी खास असलेल्या ग्रंथाविषयी आणि भारतीय संस्कृतीची झलक पहायला मिळते. यावेळी तिने हातातील तिची लग्नाची अंगठी दाखवून, तिने दोन गोष्टी साध्य केल्याचे दिसते. भारतीय संस्कृतीत असणारे कुटुंबाचे महत्त्व तिने अधोरेखित करताना स्वतःच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही चोख उत्तर दिल्याचे दिसते. 

बानरसी ब्रोकेड कॅपवरील श्लोक – 

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai ) घातलेल्या बनारसी ब्रोकेड कॅपवरील गीतेचा श्लोक आहे –

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्म ते संगोस्तवकर्मणि ।

म्हणजेच, तुमचे कर्तव्य करत रहा, फळाची अपेक्षा धरू नका, काम करण्यात कोणतीही आसक्ती ठेवू नका, सतत आपले कर्म करत रहा.

मनिष मल्होत्रा आणि गौरव गुप्ता यांनी केले कपडे डिझाईन  

ऐश्वर्या राय ने नेसलेल्या साडीची चर्चा सर्वत्र झाली. तो लुक डिझाईन केला होता आपल्या भारतीय डिझानयर मनिष मल्होत्रा याने.  तर तिच्या हॅरिस ऑफ क्लॅम या गाऊनचे डिझाईन खास तयार केले ते, गौरव गुप्ता याने. या दोन्ही लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festivel 2025 ) सहभागी होण्याचे ऐश्वर्या रायचे हे 23 वर्ष होते.

 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored