Air India Plane Crash : अहमदाबाद येथील घडलेल्या विमान अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एक एक मृत व्यक्तींच्या सुन्न कहान्या समोर येत आहेत. यातीलच एक पांड्या दांम्पत्य.
अहमदाबाद : 2025-06-13
आपल्या लाडक्या लेकीला सरप्राईज देत,तिचे कौतुक बघण्यासाठी जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा ह्रदयद्रावक अंत झाला. मुलीला सरप्राईज देण्यासाठी जाणार्या आई-वडिलांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याती माहिती समोर आली आहे. मुलीच्या दीक्षांत समारंभाला आई-वडील उपस्थित रहाणार होते. मात्र मुलीकडे पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीसह नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता पांड्या दाम्पत्य हे लंडनला जाण्यासाठी निघाले होते. मात्र एअर इंडियाच्या विमान अपघात दुर्घटनेत हे दोघेही मृत पावले. पांड्या दाम्पत्यांनी विमानात काढलेला सेल्फी आपल्या मुलाला पाठवला आणि तोच फोटे शेवटचा ठरल्याचे पहायला मिळत आहे.