एक मोठी बातमी आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे (Air India) प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.
अहमदाबाद : 2025-06-12
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीयो समोर आले आहेत. व्हिडीयोमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. अद्याप नेमकी जीवीतहानी झाली का ? याची माहिती मिळालेली नाही. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान लंडनला जात होतं. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला. या विमानात एकुण 242 प्रवासी होते. टेक ऑफच्या अवघ्या 10 मिनीटात हे विमान कोसळलं, त्यामुळे काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भागात सध्या अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या आहेत. विमानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बचावकार्य सुरू
अहमदाबादमधील मेघानी येथे हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. तांत्रिक बिघाडामुळे हे झाल्याचे बोलले जात आहे. सध्या या परिसरात उक्त धुराचे साम्राज्य पसरले आहे. विमान कोसळून त्याला आग लागली असावी, असा अंदाज लावला जात आहे. अपघाताच्या स्थळी एअर ॲम्बुलन्स पोहोचलेली आहे. जखमींना लवकरात लवकर रूग्णालयाच दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विमान जिथे कोसळलं आहे तो रहिवासी भाग आहे. त्यामुळे जवळच शासकिय रूग्णालय असल्याने जखमींना त्वरीत मदत मिळत आहे.