अहमदाबाद : 2025-06-12
Ahmedabad Air India Plane Crash Updates : एयर इंडीयाच्या अहमदाबाद वरून लंडन येथे निघालेल्या विमानाला अपघात झाला. या दुर्घेटनेत 241 प्रवाश्यांच्या मृत्यू झाला आहे. या अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही अंत झाला आहे. संपूर्ण देशासह जगभरातून या घटनेविषयी दुःख व्यक्त केले जात आहे.
Table of Contents
या घटनेच्या ठळक घडामोडी –
एएआयबी या दुर्घटेनची संपूर्ण चौकशी करणार
विमान दुर्घटना चौकशी ब्युरो (AAIB) बुधवारी झालेल्या अहमदाबाद येथील विमान अपघाताची चौकशी करणार आहे. या विमानात शिकार एअर इंडीयाच्या ड्रिमलाईनर बोईंग 787 दुर्घटनाग्रस्त विमानात 12 विमानातील कर्मचाऱ्यांसहित 242 प्रवासी होते.
दुर्घटना स्थळी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट
केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
ब्रिटीश राजा चार्ल्स -III यांनी अहमदाबाद विमान दुर्घेटनेविषयी शोक व्यक्त केला.
ब्रिटीश राजा चार्ल्स यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, मी आणि माझी पत्नी राणी कॅमिला , आज सकाळी झालेल्या अहमदाबाद मधील विमान अपघाताच्या घटनेमुळे मोठ्या धक्क्यात आहोत. बंकिग्महॅम पॅलेस कडून काढण्यात आलेल्या अधिकृत पत्रकाद्वारे त्यांचे निवेदन जाहिर करण्यात आले आहे. आमच्या प्रार्थना आणि सहवेदना अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासोबत आहेत. ज्यांचे कुटुंबीय या विमानात होते, त्यांचे सर्वांचेच नातेवाईक, कुटुंबीय त्यांच्या प्रियजनांच्या माहितीची वाट पहात आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, तसेच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अहमदाबाद त्या घटनेवर दुःख व्यक्त केले. विमान अपघातात मृत्यूपावलेल्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करत, शुक्रवारचे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. पक्षाकडून स्थिनिक कार्यकर्त्यांना शक्य ती मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुतिन यांनी व्यक्त केले दुःख
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर तिव्र दुःख व्यक्त केले आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून दुःख व्यक्त केले आहे.